फैजपूरात आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक साठी काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची संघटक मोर्चे बांधणी इदू पिंजारी फैजपूर ...
फैजपूरात आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक साठी काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची संघटक मोर्चे बांधणी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपुर येथे काँग्रेस पक्षाची संघठनात्मक बैठक जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी माजी आमदार शिरीष दादा चौधरी प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील माजी आमदार रमेश दादा चौधरी जमील शेख ज्ञानेश्वर कोळी काँग्रेस आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष संजू जमादार यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे रावेर तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी पंचायत समिती यावल माजी गटनेते शेखर पाटील युवा नेतृत्व धनंजय भाऊ चौधरी रावेर शहराचे माजी नगराध्यक्ष हरिश शेठ गनवाणी जावेद जनाब हमीद शेठ तडवी राजू सवरणे हाजी शब्बीर शेठ शेख रियाज कलीम मेंबर अय्युब मेंबर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली
आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्ष संघटन कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी व उमेदवार चाचपणी लक्ष देण्यात येणार आहे असे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले तसेच माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना व तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असणार आहे असे सांगितले तसेच येत्या २१ मे रोजी भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात भारतीय सैन्य दल नेव्ही एअर फोर्स यांनी केलेल्या कर्तबगारीच अभिनंदन करत सैन्य दलाचे मनोबल वाढवण्या करता व सैन्या बद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील "प्रेरणास्तंभ" पासून ते छत्री चौकातील 'स्वतंत्रता स्मारक' पर्यंत "तिरंगा शोभा यात्रा" काँग्रेस पक्षातर्फे २१ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व देशप्रेमींनी भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी जास्तीत जास्त संस्थेने उपस्थित राहावे ही विनंती काँग्रेस पक्षातर्फे केली आहे.

No comments