adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय डेंग्यु दिवसानिमित्त न्हावी गावात जनजागृती अभियान

  राष्ट्रीय डेंग्यु दिवसानिमित्त न्हावी गावात जनजागृती अभियान   इदू पिंजारी फैजपूर -  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राष्ट्रीय डेंग्यु दिवसानि...

 राष्ट्रीय डेंग्यु दिवसानिमित्त न्हावी गावात जनजागृती अभियान  


इदू पिंजारी फैजपूर - 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राष्ट्रीय डेंग्यु दिवसानिमित्त न्हावी गावात ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा यांच्या संयुक्त विद्यमाने डेंग्यु प्रतिबंधासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमात गावकऱ्यांना डेंग्युच्या प्रसाराचे कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन  लोकनियुक्त सरपंच  देवेंद्र चोपडे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व आणि पाण्याच्या साठ्यांमुळे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. वैद्यकीत अधिकारी डॉ. किर्ती भामरे, आरोग्य निरीक्षक  अभिजीत पगारे यांनी डेंग्युची लक्षणे आणि उपचार पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, डास प्रतिबंधक औषध फवारणी आणि स्वच्छता मोहीम नियमित राबविण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

या अभियानात आरोग्य कर्मचारी  स्वप्निल तायडे, आरोग्य सेविका श्रीमती पल्लवी भारंबे व आशा स्वमसेविका यांनी गावात जनजागृती केली. तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा . डेंग्यूला हरविण्यासाठी उपाय करा" अशा घोषणा देत त्यांनी गावकऱ्यांना जागृत केले. तसेच, घरोघरी जाऊन पाण्याच्या टाक्या, कुलर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले. गावातील महिलांनीही या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला गावकरी, आशा वर्कर्स आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डेंग्यु प्रतिबंधासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.

No comments