गरजू लाभार्थ्यांना घरकुल आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची तळमळ -:- शिवसेनेचे भरत चौधरी सर भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गाय...
गरजू लाभार्थ्यांना घरकुल आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची तळमळ -:- शिवसेनेचे भरत चौधरी सर
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दि.7 मे रोजी रोजी चुंचाळे तसेच गायरान आदिवासी वस्तीतील घरकुल सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी गायकवाड यांनी गावातील घरकुल लाभार्थी ही प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना घरकुल बांधकाम लवकर करावे याबाबत सांगितले. शिवसेनेचे भरत चौधरी
सर यांनी सांगितले चूचाळे आदिवासी गायरान वस्तीमध्ये घरकुल योजनेसाठी स्वतःची जागा असणे आवश्यक असते परंतु गायरान आदिवासी बांधवांकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्यामुळे घरकुल बांधकाम होत नव्हते हे समस्या . आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे व मा.आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने जिल्हाधिकारी जळगाव चुंचाळे गायरान येथील जागा घरकुल साठी मंजूर करून घेतली. जागा मंजूर झाल्यामुळे आदिवासी गायरान वस्तीतील 73 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. सन 2016/17 चुंचाळे गायरान मध्ये 13 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन 30 तीस हजार रुपये पहिला हप्ता देण्यात आला.
2019/20 मध्ये17 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला. हे सर्व मंजूर लाभार्थी ब यादीतील आहेत. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक लाभार्थ्यांना 300 स्क्वेअर फुट जागा देऊन त्या लाभार्थ्याने त्या जागेवर घरकुल बांधकाम करणे आवश्यक आहे. या चर्चेप्रसंगी बैठकीमध्ये गटविकास अधिकारी मंजुश्री गाव गायकवाड, शिवसेनेचे भरत चौधरी सर, मुबारक तडवी, संजय पाटील उपसरपंच, आबा पाटील, हर्षल चौधरी,सुधाकर कोडी, तिथल्या बारेला, कलिंदर तडवी, आदिवासी बांधव घरकुल लाभार्थी याप्रसंगी उपस्थित होते

No comments