Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर नगरपालिकेचा अनागोंदी कारभार अधिकारी भ्रष्ट ? ; मात्र शहरवासी त्रस्त

  फैजपूर नगरपालिकेचा अनागोंदी कारभार  अधिकारी  भ्रष्ट ?;  मात्र शहरवासी त्रस्त फैजपूर शहरात पसरलेले घाणीचे साम्राज्य इदू पिंजारी फैजपूर (संप...

 फैजपूर नगरपालिकेचा अनागोंदी कारभार  अधिकारी भ्रष्ट ?; मात्र शहरवासी त्रस्त

फैजपूर शहरात पसरलेले घाणीचे साम्राज्य

इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील नगरपालिकेत अनागोंदी कारभार  सुरू असून भ्रष्ट अधिकारी असल्याने पालिकेचा कारभार वाऱ्यावर आहे गेल्या ४ वर्षापासून मुख्याधिकारी नाही. फैजपूरवासी, नागरिक, विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी आंदोलन, उपोषण, तक्रारी देऊन सुद्धा आजपर्यंत मुख्याधिकारी नियुक्त झालेले नाही शासनाचा उदासीन कारभार येथे सुरू आहे दिवाबत्ती, घनकचरा, पाणीपुरवठा विभाग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे पालिकेतर्फे वरील विभाग ठेकेदारीत दिलेले असून ठेकेदार "हम करे सो कायदा" असा अनागोंदी कारभार करीत आहे फैजपूर शहरात मोठ्या प्रमाणात दिवाबत्ती अवस्थेत बंद आहे पाणी पुरवठा विभागात कायमस्वरूपी कर्मचारी येऊन पाहत नाही रोजंदारी कामगार यांचे नियोजन नसल्याने दोन ते तीन दिवस आड पाणीपुरवठा केला जातो मात्र वेळ नक्की कळत नाही त्यामुळे नियोजन संताप जनक आहे तर शहरात प्रत्येक वार्डात, गल्लीबोळात, मेन रोड, शॉपिंग कॉम्प्लेक्स जिकडे तिकडे नजर जाईल तेथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेत साफसफाई कामगार फिरूनही पाहत नाही तर ठेकेदारी, रोजंदारी कामगार काम चलावू काम करून निघून जातात या दिवाबत्ती, पाणीपुरवठा विभाग, घनकचरा विभागात ठेकेदार यांची मनमानी वाढलेली आहे तर न.पा. अधिकारी यांची वरील विभागात हितसंबंध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे ग्रामस्थांन कडून चर्चा होत आहे फैजपूर येथील उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी नगरपालिकेत गेल्या ४ वर्षात आंदोलने उपोषण लेखी स्वरूपाचे पत्र तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या मात्र वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत की काय अशीही चर्चा सुरू आहे  नगरपालिकेत अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघडकीस आणले आजही शेख कुर्बान यांचा संघर्ष सुरूच आहे मात्र शासनाचे अधिकारी उदासीन आहे.

No comments