adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सराईत आरोपीकडून दोन महागड्या चोरीच्या गाड्या जप्त तोफखाना पोलिसांची कारवाई

  सराईत आरोपीकडून दोन महागड्या चोरीच्या गाड्या जप्त तोफखाना पोलिसांची कारवाई   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर...

 सराईत आरोपीकडून दोन महागड्या चोरीच्या गाड्या जप्त तोफखाना पोलिसांची कारवाई  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि५):- तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस मोटरसायकल चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी रेकॉर्डवरील आरोपींना चेक करून त्यांच्याकडे तपास करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसून प्रयत्न करावा असे पोलीस अंमलदारांना तोंडी आदेश दिले होते.दिलेल्या आदेशानुसार पोलीस अंमलदार आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या समोर पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील सरेत आरोपी किशोर जयसिंग पठारे रा.पिंपळगाव माळवी (ता.जि. अहिल्यानगर) हा बुलेट मोटरसायकल वरून जाताना दिसला.त्यास पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता तो पळून जाऊ लागला असतानाच पथकाने त्यास ताब्यात घेतले व त्याच्याकडे बुलेट मोटरसायकलच्या कागदपत्रांविषयी विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आईला नगर शहरातून दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली देऊन 2 लाख 25 हजार रुपयांच्या मोटरसायकली काढून दिल्या.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट,सुनील चव्हाण,योगेश चव्हाण,वसीमखान पठाण,अहमद इनामदार, भानुदास खेडकर,सुधीर खाडे, सुरज वाबळे,सुमित गवळी, सतीश त्रिभुवन,बाळासाहेब भापसे,सुजय हिवाळे,सतीश भवर,सागर साबळे,महेश पाखरे यांनी केली आहे

No comments