उंटावद येथील कु.वैष्णवी पाटील ही डांभुर्णी विद्यालयात प्रथम आल्याने चेअरमन डॉ.विवेक चौधरी यांनी केला सत्कार. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी. (स...
उंटावद येथील कु.वैष्णवी पाटील ही डांभुर्णी विद्यालयात प्रथम आल्याने चेअरमन डॉ.विवेक चौधरी यांनी केला सत्कार.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
माध्यमीक शालांत परीक्षा २०२५ चा इ.१०वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात उंटावद येथील ह.भ.प.महेश भगवान पाटील यांची कन्या कु.वैष्णवी महेश पाटील ही ९३.६०% गुण मिळवून डांभुर्णी येथील डाँ.दिवाकर खंडू चौधरी विद्यालय व केंन्द्रात प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाली वैष्णवीचे बाबा भगवान अभिमन पाटील हे १९७५ साली सी.ए.झालेले आहेत तर वडील ह.भ.प.महेश महाराज व काका ह.भ.प.श्रीराम महाराज हे उत्कृष किर्तनकार व कथावाचक आहेत एकंदरीतच कु.वैष्णवीच्या परीवारात अध्यात्म व शिक्षणाचा वसा आहे कु.वैषणवीने मिळवलेल्या यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन व जळगाव येथील गजानन हार्ट क्रिटिकल सेंटरचे संचालक डॉ.विवेक दिवाकर चौधरी मुख्याध्यापक उमाकांत जनार्दन महाजन शिक्षक दिनेश ठाकूर,जितेंद्र फिरके,विवेक महाजन,पंकज भालेराव,भूषण भिरूड बियाणी पब्लिक स्कूल भुसावळचे प्राचार्य व वैष्णवी चे फुवा डी.एम.पाटीलसर
यांनी सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेछा दिल्या उंटावद येथील ओंकारेश्वर मंदीरात झालेल्या या
सत्काराच्या कार्यक्रमाला वैष्णवीचे बाबा भगवान अभिमन पाटील व बापूराव अभिमन पाटील इ. सह परीवारातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते.

No comments