adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तहसील चौक परिसरात लिकेज झालेली पाणी पुरवठ्याची पाईपलाईन तात्काळ दुरूस्त करण्यात यावी -:-प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप

  तहसील चौक परिसरात लिकेज झालेली पाणी पुरवठ्याची पाईपलाईन तात्काळ दुरूस्त करण्यात यावी -:-प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप  अमो...

 तहसील चौक परिसरात लिकेज झालेली पाणी पुरवठ्याची पाईपलाईन तात्काळ दुरूस्त करण्यात यावी -:-प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर -:- तहसील चौक परिसरात लिकेज झालेली पाणी पुरवठ्याची पाईपलाईन तात्काळ दुरूस्त करण्यात यावी अन्यथा सोमवार १९ मे रोजी न.प. कार्यालयात गोट्या खेळा आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज १६ मे रोजी न.प. मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.


दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर शहरातील अंतर्गत भागांमध्ये नगर परिषदेच्या वतीने पाणी पुरवठा करण्यात येतो. अनेक भागात अंतर्गत पाईपलाईन ही लिकेज झालेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यातच तहसील चौक परिसरामध्ये तर १० इंची अंतर्गत पाणी पुरवठ्याची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. एकीकडे न.प. प्रशासनाचे पाण्याचे नियोजन बारगळलेले आहे. शहर वासियांना १२ ते १५ दिवसानंतर पाणी  पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असतांना न.प.च्या नियोजनशून्य कारभारामुळे पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे. 

तहसील चौक परिसरातच पाईपलाईन फुटली असल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. हा मार्ग व चौक नेहमीच वर्दळीचा असून यावरून मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. रस्त्यावरच पाणी असल्याने वाहने स्लीप होण्याचे प्रकारही घडत आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील अंतर्गत पाईपलाईन सोबतच तहसील चौक परिसरात झालेल्या पाईपलाईनचे लिकेजेस तात्काळ दुरूस्त करावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या सोमवार १९ मे रोजी नगर परिषद कार्यालयातच गोट्या खेळा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

No comments