adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आश्रम शाळा सत्रासेन येथील उच्च माध्यमिक शिक्षक यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार…” National Excellent Teacher Award-2025

  आश्रम शाळा सत्रासेन येथील उच्च माध्यमिक शिक्षक यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार…” National Excellent Teacher Award-2025 चोपडा प्र...

 आश्रम शाळा सत्रासेन येथील उच्च माध्यमिक शिक्षक यांना “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार…”

National Excellent Teacher Award-2025



चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या रांगेत असलेली डी आर बी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सत्रासेन येथे  गेल्या 19 वर्षांपासून जीवशास्त्र विषयाचे अध्यापन करणारे, विद्यार्थीप्रिय, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भालचंद्र शिवाजी पवार यांना नुकताच रिअल इंडो ग्लोबल सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फॉउंडेशन, धुळे यांच्यातर्फे “नॅशनल एक्सलंट टीचर अवॉर्ड” अर्थात “राष्ट्रीय उत्कृट शिक्षक” हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविवारी (ता.१८) एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या सभागृहात हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनचे राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मनोहर पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.प्रमोद पवार, रिअल इंडो-ग्लोबलचे अध्यक्ष प्रा.डॉ.संभाजी पाटील, उपाध्यक्ष डॉ.मोहन पावरा, श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.एस.टी.पाटील, प्रफुल्लकुमार सिसोदे, डॉ.दिलीप पाटील, माजी प्राचार्य डॉ.पी.डी.देवरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.जगदीश पाटील, प्राचार्य श्री डॉ.पी एस लोहार  बागल महाविद्यालय दोंडाईचा विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.एस.एस. राजपूत, शिक्षणशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.एस.टी.भुकन, प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे, प्राचार्य.डॉ.एस.एम.वाघ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे साहित्य वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत “नॅशनल एक्सलंट टिचर अवॉर्ड” अर्थात “राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक” हा मानाचा पुरस्कार श्री भालचंद्र शिवाजी पवार यांना त्यांचे गुरुवर्य प्राचार्य डॉ.पी एस लोहार व श्री डॉ.जगदीश पाटील  चोपडावासी च्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला.


शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातही प्रा.पवार यांचे भरीव योगदान आहे.➧ सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय संस्था, जळगाव , रोटरी क्लब जळगाव सेन्ट्रल व युवा  फाउंडेशन, जळगाव तर्फे  "भारत रत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार 2017" 


➧  रोटरी क्लब ,चोपडा तर्फे  सन 2018 "आदर्श शिक्षक पुरस्कार"


➧  रोटरी क्लब ,चोपडा तर्फे  सन 2020 "आदर्श शिक्षक पुरस्कार"


➧   तंत्रस्नेही शिक्षक समूह,महाराष्ट्र तर्फे “आश्रमशाळा कर्तृत्वान क्रीडाशिक्षक पुरस्कार -     

       2020”


➧ शिवचरण उज्जेनकर  फाउंडेशन, मुक्ताईनगर जि.जळगाव तर्फे  कोरोना युद्ध-जन्य परिस्थिती मध्ये केलेल्या समाजसेवेबद्दल दि  16 सप्टेबर 2020 "कोरोना योद्धा गौरव पत्र " देवून सन्मान करण्यात आला.


➧ श्री. स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालय अकुलखेडा ता. चोपडा जि.जळगाव तर्फे  शैक्षणिक व सामाजिक कार्याचा दि  5  सप्टेबर 2021 रोजी "सन्मानपत्र "  देवून गौरव  करण्यात आला.


➧ शिवचरण उज्जेनकर  फाउंडेशन, मुक्ताईनगर जि.जळगाव तर्फे  विद्यार्थी व समाजहिताचे विशेष उपक्रम राबविल्याबद्दल दि  5  सप्टेबर 2021 रोजी "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई-पुरस्कार"  देवून सन्मान करण्यात आला.


➧ शिवचरण 

उज्जेनकर फाउंडेशन , मुक्ताईनगर जि.जळगाव तर्फे  कोरोना युद्ध-जन्य परिस्थिती मध्ये केलेल्या समाजसेवेबद्दल दि  7  सप्टेबर 2021 "कोरोना योद्धा गौरव पत्र " देवून सन्मान करण्यात आला.

➧लोक उदय संस्थेमार्फत सन्मानपत्र 2025 माननीय जिल्हाधिकारी आयोजित प्रसाद साहेब यांच्या शुभहस्ते 

➧शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ इयत्ता अकरावी बारावी घटक विज्ञान विषयात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023   पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी या पुरस्काराचे श्रेय आपल्या शाळेला व कुटुंबियांना दिले आहे. त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…

No comments