सातपुड्याच्या दुर्गम पाड्यांवर नियमित लसीकरण सत्र सुरू — आरोग्य विभाग व सामाजिक संस्थांचा पाठपुरावा यशस्वी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेम...
सातपुड्याच्या दुर्गम पाड्यांवर नियमित लसीकरण सत्र सुरू — आरोग्य विभाग व सामाजिक संस्थांचा पाठपुरावा यशस्वी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आकल्या पाडा, ओगाई माता व ओमाशया पाडा या तीन पाड्यांवरील नागरिकांच्या दीर्घकालीन आरोग्य समस्येवर अखेर मार्ग निघाला आहे. ‘आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर’ व ‘जपायगो’ या सामाजिक संस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या पाड्यांवर नियमित लसीकरण सत्रे सुरू करण्यात आले .
मागील दोन आठवड्यात झालेल्या गावपटेल यांच्या घेतलेल्या सामुहीक मिटींग मधुन पुढे आलेला लसीकरण सत्राचा विषय हा आज *तालुका वैद्यकीय अधिकारी चोपडा डॉ. प्रदिप लासूरकर* यांनी मार्गी लावला व येणाऱ्या काळात या भागात असलेले काही दुर्गम पाड्यावर आशा सेविकांची नियुक्ती बाबत विचार होणार असल्याचे सांगितले.
या पार्श्वभूमीवर आधार व जपायगो या सामाजिक संस्थेने गावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा करून तीनही पाड्यांवर सभा आयोजित केल्या. त्यामध्ये ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या व आरोग्य सेवा हवी असल्याची लेखी मागणी करत सह्यांची यादी तयार करण्यात होती. हा अर्ज व संलग्न माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी, चोपडा यांच्याकडे सादर करण्यात आला.
संस्थांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच या पाड्यांवर आशा सेविका नियुक्त करण्यात येणार आहेत आणि महिन्याला एकदा लसीकरण सत्र घेण्याचे नियोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. दि. 21/05/2025 रोजी कर्जाचे उपकेंद्र अंतर्गत ह्या ठिकाणी पहिले लसिकरण सत्र घेण्यात आले यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी डॉ. शोएब सर (CHO), प्रशांत बोरसे (पर्यवेक्षक) , विभांगिनी हुमणे (आरोग्य सेविका) , नवाज तडवी (आरोग्य सेवक) ,आशा सेविका, मदतनीस आदी उपस्थित होते तसेच जपयगो चे - आम्रपाली मुरार (प्रोग्राम ऑफिस) , उज्वल भगत, दिपक संदनशिव(प्रोग्राम मॅनेजर) प्रोजेक्ट चे - ज्ञानेश्वर सोनवणे(समुपदेशक) व CN- सागर पावरा , शिवा बारेला , निशांत कोळी , लेनिन महाजन,प्रिती बारेला, यांची उपस्थिती होती.

No comments