सुशांत बोरसेचा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग एम एस मध्ये अमेरिकेतील RIT युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांक चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
सुशांत बोरसेचा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग एम एस मध्ये अमेरिकेतील RIT युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांक
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील वेळोदे येथील सुशांत संजय बोरसे हे अमेरिकेत न्यूयॉर्क ( राॅचिस्टर) या शहरातील १८२९ मध्ये स्थापन झालेल्या RIT या नामांकित असलेली युनिव्हर्सिटीत एम एस सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळवला व नुकताच त्याचा पदवीदान समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला सुशांत बोरसे हे वेळोदे येथील माजी सरपंच सौ.जागृती बोरसे व मुख्याध्यापक संजय बोरसे यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक प्रथम विज्ञान मंदिर येथे झाले ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पुणे येथील आपटे प्रशाला या ठिकाणी झाले व सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण सिंहगड कॉलेज वडगाव शाखा या ठिकाणी झाले त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते अमेरिकेसारख्या देशात जाऊन शिक्षण घ्यावे व काही दिवस नोकरी करावी ते स्वप्न त्यांचे आज घडीला पूर्ण झालेले आहे. त्यांना गुरुजनांचे मित्र परिवाराचे ,नातेवाईकांचे व कुटुंबांचे सहकार्य लाभले आहे .सध्या त्याच कॉलेजला प्राध्यापक म्हणून जॉब करीत आहे.

No comments