adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वटपौर्णिमेच्या दिवशी शहरात चैन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या 2 सराईतांना तोफखाना पोलिसांनी दाखवले जेल

  वटपौर्णिमेच्या दिवशी शहरात चैन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या 2 सराईतांना  तोफखाना पोलिसांनी दाखवले जेल सचिन मोकळं अहिल्यानगर (सं...

 वटपौर्णिमेच्या दिवशी शहरात चैन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या 2 सराईतांना  तोफखाना पोलिसांनी दाखवले जेल


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि११):- वटपौर्णिमेच्या दिवशी शहरात चैन स्नॅचिंग करण्याचे उद्देशाने आलेल्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यात तोफखाना पोलीसांना यश आले आहे.दि. १० जून रोजी वटपोर्णिमा  असल्याने महिला सोन्याचे दागीने गळयात घालुन वडाचे पुजेकरीता जात असतात त्या अनुशंगाने शहरामधील पोलीस स्टेशनचे पथके तयार करुन पेट्रोलिंग नेमण्या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेशीत केले होते.दिलेल्या आदेशान्वये तोफखाना पोलीस स्टेशनचे पथके तयार करुन पथकातील अंमलदारांना वेगवेगळ्या भागात पायी तसेच मोटारसायकल पेट्रोलिंग करीता नेमण्यात आले होते.तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना  नामदेव चौक भागात दोन इसम एका विना क्रमांकाचे शाईन कंपनीचे मोटार सायकलवरुन दोघेजण हेल्मेट घालुन स्वतःचा चेहरा लपुवन चेन स्नैचिंग करण्याचे उद्देशाने सावज शोधताना दिसले त्यावरुन पोलिसांनी तात्काळ नमुद इसमांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे १)समीर गुलाब शेख वय ३८ वर्ष रा.वाळुंज पंढरपुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर २) अमर चिलु कांबळे वय २९ वर्ष रा.मुकीदपुर,झोपडपट्टी ता. नेवासा) यांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे आणखी विचारपुस करता त्यांनी  सुमारे दिड महिन्यापुर्वी गुलमोहर रोड येथे एका महिलेच्या गळयातील सोन्याचे गंठण चोरी केल्याचे कबुल केले त्यांचे कडून एक विना क्रमांकाची शाईन मोटार सायकल काळे रंगाची व दोन व्हेगो कपंनीचे हेल्मेट तसेच मोबाईल फोन असा एकुण ७९,०००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचे कडेस विचारपुस केली असता तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु र नं ४६५/२०२५ बी एन एस कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.उपनिरी.शैलेश पाटील हे करत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोनि.श्री आनंद कोकरे,पोसई.श्री.शैलेश पाटील, व तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी केली आहे.

No comments