अमोल चंदनशिवे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्री सदगुरू गंगागीर महार...
अमोल चंदनशिवे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स ॲण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगांव येथील पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विभागाचे विभाग प्रमुख अमोल चंदनशिवे यांना नामांकित गरुड फाऊंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वैद्यकीय, प्रशासकीय, सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता,आरोग्य, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व समाजहिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला जाणारा पुरस्कार दिला जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अण्णासाहेब शिंदे सभागृहात अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, रावसाहेब खेवरे, पोलीस आयुक्त संदीप भांड, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, रमेश खेमनर, पत्रकार जावेद शेख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. अमोल चंदनशिवे यांची शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान आहे. विद्यार्थ्यांना नवोपक्रमाच्या साह्याने अध्ययन निष्पत्ती देण्याचे पवित्र काम चंदनशिवे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक समाज हिताचे उपक्रम यशस्वी राबवले. विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून अमोल चंदनशिवे यांनी तळमळीने काम केले. यामुळे त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगिरथ शिंदे, प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे, उपप्राचार्य प्रा. संजय शिंदे, पर्यवेक्षक प्रा. एकनाथ कळमकर, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, प्रा. महेश पाडेकर, प्रमोददादा मोरे, सुरेश बर्वे सर, गितांजली मौळे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच शिक्षक भारती संघटना पुणे विभाग, अहिल्यानगर विभाग व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आदी संघटना पदाधिकारी, सदस्य यांनी अमोल चंदनशिवे यांचे अभिनंदन केले आहे.
वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments