सुगंधीत तंबाखु व गुटखा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे 2 गुन्हे दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानग...
सुगंधीत तंबाखु व गुटखा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे 2 गुन्हे दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१७):-शिर्डी येथील गुटखा व सुगंधीत तंबाखु विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 2 गुन्हे दाखल करून 27,017/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.दि.16 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा पानमसाला व सुगंधीत तंबाखु विक्रेत्या इसमांची माहिती काढुन,पंचासमक्ष 02 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली.त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला 03 आरोपी विरूध्द 02 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 27,017/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.जाकीर अब्दुलशकुर अन्सारी, वय 60, रा.कालीकानगर, शिर्डी, ता.राहाता,दिनेश शिवाजी बहिरट, रा.बन शिर्डी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर (फरार), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग,श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार गणेश लोंढे,रणजीत जाधव,सुनिल मालणकर,रमीजराजा आत्तार व विशाल तनपुरे यांनी केली आहे.
No comments