Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर पोलीसांची यशस्वी कारवाई ! दुचाकी चोरट्याला चोरीच्या दोन दुचाकीसह अटक

  रावेर पोलीसांची यशस्वी कारवाई ! दुचाकी चोरट्याला चोरीच्या दोन  दुचाकीसह अटक   रावेर प्रतिनिधि मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रा...

 रावेर पोलीसांची यशस्वी कारवाई !

दुचाकी चोरट्याला चोरीच्या दोन  दुचाकीसह अटक  


रावेर प्रतिनिधि मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर ते रसलपूर दरम्यानच्या  हॉटेल S2 समोरून अज्ञात चोरट्याने MH 19 CS 0392) ही दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये रावेर येथील नागझिरी मोहल्ल्यातील रहिवासी शेख अकील शेख कलीम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 याप्रकरणी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.गुन्ह्याच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजची पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाची धागेदोरे पडताळणी करून पोलीसांनी आरोपीची ओळख पटवली. रावेर पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील हद्दीतून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोटारसायकल चोरणाऱ्या  सुशील सुधाकर तायडे वय ४४, वर्ष रा. रसलपूर, ता. रावेर यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी करत चोरट्यास अटक केली  पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीने हॉटेल S2 समोरच्या व

दुसरी एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (काळा रंग - क्र. MP 68 ME 5954) अशा दोन दूचाकी चोरी केल्याची कबुली दिली व पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेल्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व कार्यतत्परतेमुळे रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीचे  नागरिकांमधून कौतुक केले जात आहे तसेच चोरीला गेलेल्या दुचाकीं चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळल्या मुळे रावेर पोलीस स्टेशनचपोलिस  पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे सदरची 

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. सिकंदर तडवी, पोना. कल्पेश आमोदकर, पोकॉ. सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकारुद्दीन शेख यांच्या पथकाने केली आहे.

No comments