adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साकळी येथील आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकतंत्र सेनानी यांचा आज 50 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आमदार अमोल दादा जावळे मित्र परिवार व डॉ. सुनिल पाटील यांनी केला सन्मान....

  साकळी येथील आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकतंत्र सेनानी यांचा आज 50 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आमदार अमोल दादा जावळे मित्र परिवार व डॉ...

 साकळी येथील आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकतंत्र सेनानी यांचा आज 50 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त आमदार अमोल दादा जावळे मित्र परिवार व डॉ. सुनिल पाटील यांनी केला सन्मान....


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल :- केंद्रातील तात्कालीन काँग्रेस प्रणित सरकारने दि.२५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लावून संपूर्ण देशातील सरकारविरोधी विचारांच्या लोकांना मिसाबंदीच्या कायद्याखाली बंदीवासात ठेवलेल्या मध्ये जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यातील अनेक संघ स्वयंसेवकांना अटक करण्यात आलेली होती. यात साकळी ता.यावल येथील तब्बल आठ स्वयंसेवकांची  धरपकड करून त्यांना अटक करण्यात आली होती. ही संख्या यावल तालुक्यातील सर्वाधिक होती.सर्व स्वयंसेवकांसाठी तो काळ अतिशय कठीण व दडपशाहिचा,अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा होता.या सर्व आठवणींचे काही साक्षीदार गावात आजही हयात आहे.दरम्यान काळाने आपली पुढे पुढे धाव घेत आज दि.२५ जून २०२५ रोजी या सर्व इतिहास झालेल्या काळाला तब्बल पन्नास वर्षाचा काळ लोटला गेलेला आहे. तरीही त्या काळातील  आठवणी मिसाबंदीतील कारावास भोगलेल्या स्वयंसेवकांच्या हृदयाचा जिवंत आहे. हे विशेष आहे.

          साकळी गाव फार पूर्वीपासून राष्ट्रीय विचारसरणीचे व घराघरात संघ स्वयंसेवक असणारे गाव आहे.संघ स्थापनेपासूनच देशभक्तीच्या विचारसरणीने प्रभावित झालेले अनेक ज्येष्ठ- श्रेष्ठ संघाचे स्वयंसेवक गावात होऊन गेलेले असून नविन स्वयंसेवक घडण्याची परंपरा निरंतर सुरू आहे.संघ शाखा हे जीवनाचे अंतिम सत्य मानणाऱ्या गावातील काही जेष्ठ-श्रेष्ठ स्वयंसेवकांनी आपल्या संसार प्रपंचावर ' तुळशीपत्र ' ठेऊन संघकार्यासाठी जीवन समर्पित केलेले आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पन्नाशीत असतांना देशात काँग्रेस प्रणित सरकारने देशात आणीबाणी लागू करत आणीबाणी विरोधातील अनेकांना अटक केली या दरम्यान संघाच्या कार्यकर्त्यांच्या धरपकडित साकळी ता. यावल येथील स्व.शांताराम (बापू) नानाजी नेवे, स्व.डॉ.गोकुळ उखर्डू नेवे,स्व.अरुण राजाराम नेवे,स्व.बुधो तुकाराम तायडे,धोंडू (अण्णा) देवचंद माळी,वसंत खुपचंद बडगुजर,प्रताप लक्ष्मण बडगुजर,रामकृष्ण पुरुषोत्तम नेवे या तब्बल आठ स्वयंसेवकांना क्रमाक्रमाने अटक केली.सर्व स्वयंसेवक ऐन तारुण्यात व उमेदीच्या उंबरठ्यावर होते.कोणाचा नवीन संसार होता,कुणाचे लहान लहान मुले- बाळे होती,कुणाच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी होती,कोणी घरातील कर्ता पुरुष होता.अश्या अशा परिस्थितीत कायद्याच्या पालनकर्त्यांनी या स्वयंसेवकांना जसे जमेल तशी अटक केली. सर्वांना एका ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले.कोणी दहा महिने, कोणी बारा महिने तर कोणी दीड- दोन वर्षाच्या कालावधीसाठी अटकेत राहिले.घरातील कर्त्या माणसाला अटक केल्यानंतर आमच्या पश्चात घराची अवस्था काय असेल ? आर्थिक उत्पन्नाचे कोणतेच स्रोत नसतांना कुटुंबाने कसे दिवस काढले असतील ? कोणी मदत केली ? या आठवणी सांगताना या स्वयंसेवकांना आजही डोळे पाणावतात,अंगावर काटा उभा राहतो.मन हेलावून जाते.या काळात या सर्वच स्वयंसेवकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले.सध्याच्या घडीला या आठ स्वयंसेवकांपैकी चार स्वयंसेवक मयत झालेले असून सध्या चार हयात आहे.हयात असलेले चार स्वयंसेवकांनी ८० च्या दरम्यान वयोमान गाठलेले असून आयुष्याचे शेवटचे पर्व आपल्या कुटुंबाच्या आधाराने जगत आहे.त्यांना शासनाचे जिवन जगण्यापुरता मानधनही सुरू आहे.मात्र आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात दुर्धर आजार व इतरही शारीरिक व्याधींनी या स्वयंसेवकांचे सध्याचे आरोग्य काळजीचे बनले आहे.सोबत त्यांच्या पत्नीचे हे वृद्धपण आहे.ही सर्व परिस्थिती पाहता मिसाबंदीच्या स्वयंसेवकांसाठी आरोग्याबाबत शासन स्तरावरून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी.जेणे करून या स्वयंसेवकांचे जगणे सुसह्य बनेल.अशी अपेक्षा आहे. आणीबाणीच्या काळाला आज दि.२५ जून २०२५ रोजी पन्नास वर्ष झाली. मात्र मिसाबंदीच्या कायद्यांतर्गत काही एक कारण नसताना विनाकारण शिक्षा झालेल्या या स्वयंसेवकांच्या मनामध्ये आजही प्रखर राष्ट्रभक्तीची व हिंदुत्वाची विचारधारा धगधगत असल्याचे नेहमीच जाणवत असते.विचारातून प्रेरणा मिळत असते.या सर्व स्वयंसेवकांच्या मिसाबंदीच्या अटकेच्या प्रसंगांच्या आठवणीतून नवीन स्वयंसेवकांना कायमच राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत राहील हे मात्र अटळ सत्य असून  हेच मिसाबंदीच्या पन्नाशीच फलीत असेल.

      आमदार अमोल दादा जावळे मित्र परिवार व साकळी येथील भूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष, भाजपा वैद्यकीय आघाडी जळगाव जिल्हा पुर्व उपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील साकळीकर यांनी साकळी येथील हयात असलेल्या 4 लोकतंत्र सेनानी सन्माननीय आण्णासाहेब धोंडू देवचन्द माळी, दादासाहेब वसंतराव खुपचंद बडगुजर, आप्पासाहेब प्रताप लक्ष्मण बडगुजर, दादासाहेब रामकृष्ण नेवे यांचा छोटेखानी सन्मान शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन केला. सदर कार्यक्रमास पिळोदा येथील माजी पोलीस पाटील गयभू दत्तात्रय पाटील, मनवेल येथील उद्योजक समाधान नीलकंठ पाटील, महेंद्र पाटील, अजय पाटील, हेमंत वाघळे ,हर्षल पाटील उपस्थित होते. मागील जानेवारी महिन्यात या लोकतंत्र सेनानी यांच्या थकीत मानधन  आमदार अमोलदादा जावळे यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार मला डॉ सुनिल पाटील यांना म तहसीलदार यांकडे पाठपुरावा केल्याने मिळाले, त्यारूपाने माझ्यापरीने एक सेवा झाल्याचे डॉ. सुनिल पाटील यांनी सांगितले.

No comments