adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जय रावण प्रतिष्ठान संघटनेच्या 6 व्या वर्धापदिनानिमित्त संघटनेचे अध्यक्ष अमोल संजय पारधी यांच्या संकलपनेतून गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

  जय रावण प्रतिष्ठान संघटनेच्या 6 व्या वर्धापदिनानिमित्त संघटनेचे अध्यक्ष अमोल संजय पारधी यांच्या संकलपनेतून गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत...

 जय रावण प्रतिष्ठान संघटनेच्या 6 व्या वर्धापदिनानिमित्त संघटनेचे अध्यक्ष अमोल संजय पारधी यांच्या संकलपनेतून गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप  


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

जय रावण प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज चोपडा येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा 3 येथे गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाचा हक्क प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामजिक कार्यकर्ता ऍडव्होकेट संजय शांताराम पारधी उपस्थित होते. त्यांनी जय रावण प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि म्हणाले, "शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे. जय रावण प्रतिष्ठानचे हे प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी आहेत."


जय रावण प्रतिष्ठानचे महासचिव  यांनी सांगितले, "आमची संघटना नेहमीच अन्यायाविरुद्ध लढते आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्याचे काम करते. हा कार्यक्रम आमच्या मिशनचा एक भाग आहे, आणि आम्ही भविष्यातही असे उपक्रम सुरू ठेवू."

या कार्यक्रमात स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमात उपस्थीत - जय रावण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विक्की पारधी, युवा अध्यक्ष अक्षय पारधी, अजय चव्हाण व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आनंदाने साहित्य स्वीकारले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्याने उपस्थितांचे मन जिंकले.

जय रावण प्रतिष्ठानबद्दल- 

जय रावण प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य ही एक सामाजिक संघटना आहे, जी शिक्षण, सामाजिक न्याय, आणि गरीब समुदायाच्या उत्थानासाठी कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही संघटना विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवत आहे.

No comments