adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका ! केळीपीक जमीनदोस्त तालुक्यात 686 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

  रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका ! केळीपीक जमीनदोस्त  तालुक्यात 686 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान  रावेर तालुका प्रतिनिधी मुबारक तडवी  (संप...

 रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका ! केळीपीक जमीनदोस्त  तालुक्यात 686 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 


रावेर तालुका प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यासह परिसरात दि २९ जून रोजी दिनांक 29जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या जोरदार अती वेगाने वादळी वारासोबत पावसाने हजेरी लावल्याने रावेर तालुक्यातील 342 हेक्टर च्या वरती  केळी पीकाच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहे.


रावेर तालुक्यातील वाघोदा बु,, मस्कावद बु, मस्कावद खुर्द, मस्कावद सीम, दसनूर, सिंगनूर, सावदा, कोचूर बु, कोचूर खुर्द, रोझोदा, खिरोदा प्र यावल, जानोरी,लोहारा, कळमोदा,कुंभारखेडा, सावखेडा, कुसुंबा,

विवरे खुर्द, विवरे बु, खिर्डी बु, खिर्डी खुर्द, रेंभोटा, वाघाडी, बलवाडी, तांदलवाडी, निंभोरा बु, रावेर, ऐनपूर, निंबोल, मुंजलवाडी, उटखेडा, भाटखेडा खिरवड, पुनखेडा व पातोंडी या गावातील शेती शिवारातील अंदाजे 686 शेतकऱ्यांच्या केळीबागा जमीनदोस्त झाल्या.

असून यामुळे अंदाजे 15 कोटी 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज रावेर 

रावेरचे तहसीलदार बंडू कापसे,  कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी वर्तवला आहे.

*मोठे वाघोदा परिसरात रावेर तहसीलदारांकडून वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी* मंडळाधिकारी तलाठी यांना दिले पंचनामे करण्याचे आदेश 

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा परिसरात  दिनांक 29 रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वाघोदा परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे आज रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी निंभोरा रोडवरील तसेच वाघोदा परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची भागाची पाहणी केली व तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठविण्यात येईल असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले तसेच गावातही व रस्त्यावरही काही झाडे पडली होती त्यामुळे विद्युत तार तुटल्या होत्या यामुळे गावातील विद्युत पुरवठा 6 तास वीज पुरवठा बंद होता पाहणी करताना शेतकऱ्यांसोबत तहसीलदार बंडू कापसे तसेच नव्याने रुजू झालेले तलाठी मधुराज पाटील तसेच माजी उपसरपंच राहुल पाटील वैभव पाटील सूर्यकांत देशमुख जयेश महाजन तसेच सर्व शेतकरी उपस्थित होते

No comments