पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात सीड्स बॉल उपक्रम चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) उपक्रमशील शिक्ष...
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात सीड्स बॉल उपक्रम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
उपक्रमशील शिक्षक , चित्रकार ,इको क्लब प्रमुख सुनिल दाभाडे यांचा नाविण्यपूर्ण उपक्रम.माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले.... पिठासारखे मळून घेतले....छोटे -छोटे गोळे तयार करुन त्यात बिया घातल्या... त्याला हाताने बाल सारख्या आकार दिला...त्यानंतर काही वेळात तयार झाले सीड्स बॉल .
जळगाव येथील मानव सेवा मंडळ, जळगाव प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे इको क्लब उपक्रम अंतर्गत सीड्स बॉल ( बीज गोळे) बनविण्याची कार्यशाळेत इको क्लबचे प्रमुख , सुनिल दाभाडे यांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सीड्स बॉल कसे बनवावे तसेच सीड्स बॉल चे महत्व सांगून विद्यार्थ्यांकडून सीड्स बॉल बनवून घेतले.या उपक्रमात इ.5 वी ते 7वीच्या विद्यार्थ्यानी उत्साहाने सहभाग घेतला.
जळगांव सिटी स्मार्ट सिटी....जळगांव सिटी ग्रीन सिटी .... झाडे लावा, झाडे जगवा .. च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी,विद्यार्थ्याना पर्यावरणाबाबत असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी ,पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने झाड लावून आपल्या चांगल्या भविष्याची तरतूद करावी तसेच आपण लावलेल्या झाडाचे भविष्यातील फायदे असे आपल्या मार्गदर्शनात शाळेचा मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी सांगितले.
म्हणून मागील वर्षी मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरामध्ये 'इको क्लब 'ची स्थापना करण्यात आली आहे.
या उपक्रमात पर्यावरणाचे धडे देण्याबरोबरच विद्यार्थी शाळेत व परिसरात वृक्षारोपण करून संगोपन करणार आहे. या झाडांना विद्यार्थ्याची नाव,आईचे नाव व त्यांच्या वर्गाची नाव लिहुन झाडाजवळ पाटी लावली आहे.
या उपक्रमांतर्गत इको क्लब मिशन प्रमुख शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर ,इको क्लबचे समन्वयक सुनिल दाभाडे, इको क्लबचे विद्यार्थी व इ1ली ते 7 वीचे प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्याची सदस्य म्हणून निवड करण्यात येणार आहे.
उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, कचरा कमी करणे, ऊर्जा संवर्धन व पाण्याची बचत करणे,प्लास्टिक वापर टाळणे ,वृक्षारोपण या संकल्पनावर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
इको क्लबचा माध्यमातून इको क्लबचे समन्वयक सुनिल दाभाडे यांनी मातीपासून सीड बॉल बनवून त्यात पेरु,आंबा,चिंच ,निम,सिताफळ, जांभुळ अशा अनेक फळ झाडांचा बियांपासून 600-700 मातीचे सीड बॉल बनवून नदी किनारी, डोंगर भागात ,परिसरातील रस्ताचा किनारी टाकण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेचा मुख्याध्यापिका माया अंबटकर ,बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील ,इको क्लबचे समन्वयक सुनिल दाभाडे ,इको क्लबचे विद्यार्थी ,, मनोजकुमार बावस्कर, योगिता घोलाणे , सर्व शिक्षक व इको क्लब चे सदस्य उपस्थित होते.
इको क्लब उपक्रम अंतर्गत सीडस बॉल कार्यशाळा घेतल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया ,मानद सचिव विश्वनाथ जोशी व सर्व पदाधिकारी सदस्य यांनी इको क्लब टिमचे अभिनंदन केले.
No comments