एसटी महामंडळाचे हात दाखवा गाडी थाबंवा घोष वाक्य कागदावरच यावल आगारातील वाहक - चालकांचा मनमानी कारभार फाईल चित्र भरत कोळी यावल ता.प्रतिनि...
एसटी महामंडळाचे हात दाखवा गाडी थाबंवा घोष वाक्य कागदावरच
यावल आगारातील वाहक - चालकांचा मनमानी कारभार
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : राज्य परिवहन महामंडळ एसटी तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी आवडेल तिथे प्रवाश, शाळेतील मुलीनां आहिल्याबाई होळकर प्रवाश योजना अर्तंगत सवलत सह विविध प्रकारच्या योजना राबवित असून हात दाखवा बस थांबवा असे ब्रीद वाक्य असलेले पोस्टर प्रसिद्ध करीत आहे मात्र याला यावल आगारातील वाहक चालकांकडून मात्र घोषवाक्यला कागदावरच ठेवले जात असल्याचा अनुभव प्रवाश्यांना येत आहे.
यावल आगाराची बस क्रमांक एम एच २० बी.एल. १४२५ विना फलकांची बस किनगाव कडून यावल कडे जात असतांना साकळी गावाजवळ एका केळी वेर्फरच्या दुकानाजवळ थांबली असता काही प्रवाशी त्या दुकानांपासून यावल येथे जाण्यासाठी एसटीचे फाटक उघडून बस मध्ये चढले असता वाहकाने एसटी बस मध्ये बस चढण्याकरीता मज्याव करीत तुम्ही साकळी स्टॉफ जवळ या तेथून बसा असे सागून प्रवाशी बसविले नसल्याने त्या वाहक बद्दल त्रीव स्वरूपात नाराजी व्यक्त करीत दुरध्वनी द्वारे तक्रार केली आहे .
प्रवाशी यांनी सांगीतले की गाडी केळीचे वेर्फरस घेण्यासाठी थांबली व एसटी मध्ये बसलो असता स्टॉप वरून बसा असे सांगितले मात्र मी दुसऱ्या स्टॉपचे तिकीट नियमानुसार तिकीट मागितले तरी सुद्धा बस मध्ये चढण्यासाठी फाटक न उघडता बस पुढे घेऊन गेल्याने पायपीट करावी लागली अशी प्रतिक्रिया प्रवाश्यांनी दिली.
केळीचे वेफर्स घेण्यासाठी बस थांबा विना थांबते मात्र हात दाखवा बस थांबवा असे घोषणा एसटी महामंडळाने सुरू केलेल्या उपक्रमाला वाहक चालक प्रतिसाद देत नसतील तर एसटी नफ्यात येणार तरी तशी असा मनमानी कारभार करणाऱ्या वाहक चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे

No comments