यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांची जळगावला बदली – रंगनाथ धारबळे यावलचे नवीन पोलीस निरिक्षक भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:-ह...
यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांची जळगावला बदली – रंगनाथ धारबळे यावलचे नवीन पोलीस निरिक्षक
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर यांची प्रभारी जिल्हा पेठ जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शनीपेठ, जळगाव येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे यांची यावल पोलीस स्टेशनवर नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर हे मागील दीड वर्षांपासून यावल पोलीस स्टेशनवर कार्यरत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार प्रशासकीय कारणास्तव व कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याभरातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये यावलचे निरीक्षक प्रदीप ठाकुर यांचाही समावेश आहे.
नवीन नियुक्त झालेले निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे हे यापूर्वी शनीपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे कार्यरत होते. यावल पोलीस ठाण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात स्थानिक पातळीवरील कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments