किसान महाविद्यालयात 'एक पेड मां के नाम उपक्रम: डॉ. सतीश पाटील यांच्याकडून पर्यावरण संवर्धन संदेश पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...
किसान महाविद्यालयात 'एक पेड मां के नाम उपक्रम: डॉ. सतीश पाटील यांच्याकडून पर्यावरण संवर्धन संदेश
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि. २३ जून २०२५ रोजी भारत सरकार युवा,कार्य व खेळ मंत्रालय दिल्ली ,क. ब. चौ. उ. म. वि,जळगाव आणि किसान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक आयोजित 'एक पेड मां के नाम 2.0' या अनोख्या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर उपक्रमास संस्थाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली. यावेळी त्यांनी स्वतः एक रोपे लावून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. उपस्थितांना संबोधित करत त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व आणि त्याच्या संवर्धनाची गरज यावर विचारमंथन करतांना "आई आणि निसर्ग हे दोन्ही आपल्याला जीवन देतात. या दोघांचेही ऋण आपण कधीही फेडू शकत नाही असे मत मांडले.. 'एक पेड मां के नाम 2.0' हे अभियान अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे केवळ झाडे लावली जात नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती आपुलकी आणि जबाबदारीची भावना निर्माण होते." त्यांनी विद्यार्थ्यांना लावलेल्या झाडांची काळजी घेण्याचे आणि पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच सक्रिय राहण्याचे आवाहन केले. लावलेली ही झाडे केवळ सावली देणारी नसतील तर ती तुमच्या आईच्या आशीर्वादाप्रमाणे तुम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील." विद्यार्थ्यांनी लावलेल्या प्रत्येक झाडाची काळजी घेण्याचे आणि भविष्यातही पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
'एक पेड मां के नाम 2.0' या उपक्रमाचा उद्देश केवळ वृक्षारोपण करणे हा नसून, प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरणाशी भावनिकरित्या जोडून, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देणे हा आहे असे मत प्राचार्य डॉ.वाय.व्ही.पाटील यांनी मांडले. आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याची निगा राखणे, ही संकल्पना यावेळी रुजवण्यात आली.या कार्यक्रमात आंबा, कडुलिंब, चिंच, गुलमोहर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे लावण्यात आली.या अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आईच्या नावाने एक रोपटे लावून त्याची निगा राखण्याची जबाबदारी देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जी.एच.सोनवणे,आइक्यूएसी समन्वयक डॉ. दिपक सांळुखे,प्रा.प्रमोद चौधरी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. सर्वांनी उत्साहात वृक्षारोपण करून पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी दर्शवली. हा कार्यक्रम केवळ वृक्षारोपण न राहता, एक सामाजिक संदेश देणारा आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारा उपक्रम ठरला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना एकक कार्यक्रम अधिकारी प्रा.काकासाहेब गायकवाड,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.सविता चौधरी यांनी केले.

No comments