adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एरंडोल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

  एरंडोल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी - (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  एरंडोल येथे अनेक शैक्षणिक व ...

 एरंडोल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.


प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी -

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 एरंडोल येथे अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

रा.ती.काबरे विद्यालय

        शहरातील रा.ती.काबरे विद्यालयाच्या प्रांगणावर सुमारे २००० विद्यार्थी,एरंडोल न्यायालयाच्या न्यायाधीश बी.ए.तळेकर,वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य,कर्मचारी, भाजपा एरंडोल विखरण रिंगणगाव मंडळाचे अध्यक्ष योगेश महाजन,माजी नगरसेवक जगदिश ठाकूर, संदिप पाटील, ॲड.मधुकर महाजन,ॲड.आकाश महाजन,भाजपचे पदाधिकारी,रा.ती.काबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

गोपी गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल.

       शहरातील गोपी गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते  यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते, ब. वि.विसपुते सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य दिलीप पांडे,साहेबराव देवरे,जगदिश मोरे,विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक व्यवस्थापन समितीचे सदस्य हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य सुनील ठाकरे, उपप्राचार्या ज्योती वडगावकर यांनी केले.सुत्रसंचलन रत्ना पटवारी,रोहित सपकाळे यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विद्यालय

शहरातील प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी इंगळे,बी. के.पुष्पा दीदी,सविता दीदी,छाया दीदी यांनी उपस्थित योग करणाऱ्या समोर आपले बहुमोल विचार मांडले.

No comments