adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्राचीन जैन अतिशय क्षेत्रावर जैन मुनीवर्यांच्या चातुर्मास स्थळाबाबत उत्तर महाराष्ट्र वासियांमध्ये उत्सुकता

  प्राचीन जैन अतिशय क्षेत्रावर जैन मुनीवर्यांच्या  चातुर्मास स्थळाबाबत उत्तर महाराष्ट्र वासियांमध्ये उत्सुकता चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेम...

 प्राचीन जैन अतिशय क्षेत्रावर जैन मुनीवर्यांच्या  चातुर्मास स्थळाबाबत उत्तर महाराष्ट्र वासियांमध्ये उत्सुकता


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

         उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला श्री.१००८ कुंथुनाथ दिगंबर जैन प्राचीन जैन अतिशय क्षेत्रावर दरवर्षी मुनीवर्याचे  तसेच आर्यिका माताजी (साध्वी )यांचा चातुर्मास ऐतिहासिक व असा मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक उपक्रमात साजरा होत असतो. त्याचा अलभ्य लाभ उत्तर महाराष्ट्रवासीय विशेषतः आवर्जून लाभ घेत असतात. त्यामुळे त्यांचे लक्ष यावर्षीचा चातुर्मासमध्ये आर्यिका माताजी आणि मुनिवर्यांचा   कोणत्या तपस्वींचा  चातुर्मास अर्थात वर्षायाेग  संपन्न होणार याविषयी क्षेत्राचे विश्वस्त आणि पार्श्वनाथ सेवासमितीचे पद्मावती युवा मंच कार्यकर्त्यांना विचारणा सतत होत असते .अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख सतीश वसंतीलाल जैन  यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी तपस्वींचा चातुर्मास व्हावा यासाठी पद्मावती युवा मंच कार्यकर्ते ज्या स्थळी आर्यिका माताजी व  मुनिश्री असतील त्या त्या ठिकाणी जाऊन क्षेत्रावर चातुर्मास  व्हावा अशी विनंती करून आपल्या भावना प्रकट करीत आहेत. खान्देश जन्मभूमी असलेले मोठ्या संख्येने मुनीवर आर्यिका माताजी तपस्वी  कार्यरत आहेत. त्यांचाही चातुर्मास स्थळाबाबत भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येत आहेत‌.

No comments