adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

न्हावी येथे बांधकाम कामगार योजनेतून गृहउपयोगी भांडे वाटप; आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना नागरिकांचा प्रतिसाद

  न्हावी येथे बांधकाम कामगार योजनेतून गृहउपयोगी भांडे वाटप; आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना नागरिकांचा प्रतिसाद भरत कोळी यावल ता.प्रतिन...

 न्हावी येथे बांधकाम कामगार योजनेतून गृहउपयोगी भांडे वाटप; आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना नागरिकांचा प्रतिसाद


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळत असून, त्यांच्याच पुढाकारातून बांधकाम कामगार योजनेअंतर्गत न्हावी गावातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना मोफत गृहउपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्यात आला. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे आणि कृतज्ञतेचे वातावरण दिसून आले.

या वेळी भाजप प्रदेश कमिटीचे सदस्य हर्षल पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नरेंद्र कोल्हे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी, तालुका सरचिटणीस विलास चौधरी आणि उज्जैन सिंग राजपूत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती अतुल भालेराव, जिल्हा दूध संघ संचालक नितीन चौधरी, खरेदी विक्री संघ संचालक प्रवीण वारके महिला मोर्चा तालुका अध्यक्ष जयश्री चौधरी, फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे, बाजार समिती संचालक यशवंत तळेले, शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. के. जी. पाटील, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भारती पाटील, किशोर वाणी, पराग वाघुळदे, सचिन इंगळे, पंकज बोरोले, नरेंद्र चौधरी, धीरज चौधरी, अमोल वारके, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र तायडे, संदेश महाजन, माजी उपसरपंच नदीम पिंजारी, सतीश बऱ्हाटे आणि ग्रामपंचायत सदस्य आदींची उपस्थिती होती.

गरजू महिलांना मिळालेल्या भांड्यांच्या संचामुळे घरगुती कामांमध्ये मोठा उपयोग होणार असल्याने लाभार्थ्यांनी आमदार अमोल जावळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. कामगार कल्याण योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments