adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने यावल शहरातील विविध समस्यांचे निवेदन व स्मरणपत्र निवेदन

  शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने यावल शहरातील विविध समस्यांचे निवेदन व स्मरणपत्र निवेदन भरत कोळी यावल ता‌. प्रतिनिधी (संपाद...

 शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने यावल शहरातील विविध समस्यांचे निवेदन व स्मरणपत्र निवेदन


भरत कोळी यावल ता‌. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने यावल शहरातील विविध समस्यांचे निवेदन व स्मरणपत्र निवेदन प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा करून निवेदन देण्यात आले.यात प्रामुख्याने निवेदनात यावल शहरातील बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्ता दुरुस्ती बाबत (स्मरणपत्र)२)मेन रोड वरील अपूर्ण राहिलेली नाले सफाई पूर्ण करणे बाबत (स्मरणपत्र)३)यावल शहरातील वीसकळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत व वेळे नुसार करणेबाबत व इतर कामे करण्यासाठी सविस्तर चर्चा मा मुख्याधिकारी श्री गवई साहेब तसेच संबधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात येवून निवेदन देण्यात आले.त्याच प्रमाणे यावल शहरातील साफसफाई बाबत देखील चर्चा करण्यात आली.पांडुरंग सराफ नगर येथील खोल खड्डा चारी बुजण्या बाबत चर्चा झाली.

निवेदनात म्हटले आहे की बोरावाल गेट ते भुसावळ नाका रस्त्या बाबत यापूर्वी काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते परंतु अद्याप पावेतो हा रस्ता दुरुस्ती व नूतनीकरण मंजूर असून देखील करण्यात आलेला नाही.ह्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून गावाच्या प्रवेश दारावरच चिखल झालेला असून या रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता आहे.तरी त्वरित दुरुस्ती वा तात्पुरती मुरूम टाकून रस्ता वापरता योग्य करण्यात यावा.

मध्यंतरी यावल शहरातील गटारी नाले सफाई करण्यासाठी शिवसेनेने निवेदन दिल्यावर काम सुरू केले होते मात्र अपूर्ण काम करण्यात आले.म्हसोबा मंदिर ते बोरावाल गेट,चोपडा रोड ते बस स्थानक,भुसावळ टी पॉइंट ते भुसावळ रोड ही नाले सफाई करण्यात आली नाही.जास्त पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास ह्या मार्गावर घात अपघात होण्याची शक्यता नाकारतां येत नाही.पाणी रस्त्यावर साचल्यास नागरिकांना अनेक अडचणींस तोंड द्यावे लागेल.तरी तातडीने नाले गटारी सफाई करावी.

शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा वेळापत्रक विस्कळीत झालेला असून काही भागात २-३ दिवसा आड तर काही भागात ४-५ दिवसा आड पाणीपुरवठा होत आहे.तर नियमित वेळे नुसार न होता कधी सकाळी तर कधी दुपारी तर कधी संध्याकाळी होत आहे त्यामुळे पाणी भरणाऱ्या महिलांची,मजुरीला जाणाऱ्या कष्टकऱ्यांची,नागरिकांची तारांबळ उडते.यावल शहरातील सर्वच नळधारक सारखी पाणीपट्टी भरत असतांना वेळेचा व पुरवठ्याचा भेदभाव का केला जातो आहे असे नागरिक विचारत आहेत.तरी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत नियमित वेळे नुसार पाणीपुरवठा केला जावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देते वेळी यावल शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जगदीश कवडीवाले,तालुका उप प्रमुख शरद कोळी,माजी तालुका प्रमुख कडू पाटील,संघटक पप्पू जोशी,शहर उप प्रमुख संतोष धोबी, शहर उप प्रमुख योगेश राजपूत पाटील विभाग प्रमुख प्रकाश वाघ,हुसेन तडवी,योगेश चौधरी,विजय पंडित कुंभार,पिंटू कुंभार,विभाग प्रमुख सारंग बेहेडे आदी शिवसैनिक उपस्थित होते

No comments