वाघुड येथील रस्त्याची त्वरित खडीकरण करून दुरुस्ती करा... प्रहार जनशक्ती पक्षाची निवेदनाद्वारे मागणी अन्यथा ग्राम पंचायत कार्यालयात टाला ठो...
वाघुड येथील रस्त्याची त्वरित खडीकरण करून दुरुस्ती करा... प्रहार जनशक्ती पक्षाची निवेदनाद्वारे मागणी
अन्यथा ग्राम पंचायत कार्यालयात टाला ठोकून आंदोलन करणार
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- वाघुळ गावातील वार्ड नंबर दोन मधील लोक वस्तीला जुळलेला मेन रोड जड वाहतुकीमुळे पूर्णपणे खचला आहे गुडघाभर पाण्यातून शाळेत येणारे विद्यार्थी व शेतात जाणारे मजूर यांना हा एकमेव रस्ता आहे मागील बरेच दिवसापासून ग्रामपंचायतला मागणी करून सुद्धा ग्रामपंचायत या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे
त्यामुळे आज दिनांक 23 जून रोजी गावातील नागरिक यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष यांना आपली समस्या सांगितली त्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अजित फुंदे यांनी तत्काळ पंचायत समिती मलकापूर येथे जाऊन गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम करण्याची मागणी केली रस्ता दुरुस्ती झाली नाही तर पुढील सात दिवसांनी ग्रामपंचायत वाघूड याला ताला ठोकण्याचे निवेदन दिले यावेळी गावातील दीपक बोदडे, निलेश घाटे, योगेश विंचनकर, गौरव शिरसाठ, धीरज दाभाडे, विठ्ठल राजपूत, राहुल दाभाडे, राजेश चव्हाण,ऋषी दाभाडे आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते


No comments