प्रश्न सोडवण्याच्या आस्वासनावर दिव्यांग फाउंडेशनच्या आंदोलन स्थगित... अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : मलकापूर ...
प्रश्न सोडवण्याच्या आस्वासनावर दिव्यांग फाउंडेशनच्या आंदोलन स्थगित...
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अनेक नगरांमधील रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड़े की खड्यात रस्ते अशी येथील परिस्थिती आहे.
त्यामुळे पादचार्यांसह वाहनधारकांना मोठा त्रास होत असून तात्काळ सदर रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी ता.१३ जून रोजी दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपडे यांनी ग्रामसेवक यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली होती.
तसेच या रस्त्याच्या दुरुस्ततीला मुहूर्त लागत नव्हता म्हणून ता.२० जुन रोजी ग्रामसेवक यांना स्मरण पत्र सुद्धा देण्यात आले होते.रस्ता दुरुस्तीप्रश्नी २६ जुन गुरुवार रोजी खड्यात बसून अर्ध आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याची दखल ग्रामपंचायतने घेऊन दि. 10 जुलै पर्यंत रस्ता दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाला स्थगिती दिल्याची माहिती दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळु चोपडे यांनी दिली आहे. जर दि.10 जुलै पर्यंत रस्ता दुरुस्ती कामास सुरुवात न झाल्यास ग्रामपंचायत अधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील निलेश चोपडे यांनी दिला आहे.

No comments