adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महिला पोलीस अंमलदारास शिवीगाळ करून दिली धमकी..डॉक्टरसह दोघांविरूध्द तोफखान्यात गुन्हा दाखल

  महिला पोलीस अंमलदारास शिवीगाळ करून दिली धमकी..डॉक्टरसह दोघांविरूध्द तोफखान्यात गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर  (संपादक -:- हेमकांत गायक...

 महिला पोलीस अंमलदारास शिवीगाळ करून दिली धमकी..डॉक्टरसह दोघांविरूध्द तोफखान्यात गुन्हा दाखल



सचिन मोकळं अहिल्यानगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर शहरातील तारकपूर परिसरातील एका नामांकित हॉस्पिटल समोर महिला पोलीस अंमलदाराला उद्देशून झालेल्या शिवीगाळ व दमबाजी प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात डॉक्टरसह दोघांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार मिनाबाई भाऊ रेपाळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.त्या रविवारी (दि.२२) रोजी दुपारी साडेतीन वाजता हॉस्पिटलमध्ये वासुंदे (ता. पारनेर) येथील अपघातग्रस्त रूग्णाचा जबाब घेण्यासाठी त्या गेल्या होत्या.रेपाळे यांनी हॉस्पिटल समोरील पार्किंगमध्ये आपले वाहन लावले होते.त्याच वेळी हॉस्पिटलमधून बाहेर आलेले डॉ.अभय पाटील याने तुम्ही येथे गाडी का लावली? असा जाब विचारत शिवीगाळ केली.यानंतर प्रणिती पवार नावाची महिला देखील तेथे आली व तु आमच्या डॉक्टरांना का बोललीस? तु येथे गाडी का पार्क केलीस? अशी विचारणा करत शिवीगाळ करत धमकी दिली की,तुझ्याकडे बघून घेते. या प्रकारामुळे पोलीस अंमलदार रेपाळे यांचा अपमान झाला असून,या प्रकरणी रेपाळे यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. अभय पाटील व प्रणिती पवार यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments