एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरणारा एमआयडीसी पोलिसांनी केला जेरबंद सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि२४):-एमआय...
एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरणारा एमआयडीसी पोलिसांनी केला जेरबंद
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२४):-एमआयडीसी परिसरातून दुचाकी चोरणारा संशयित आरोपी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
कृष्णा रवींद्र निंबे (रा.भगवतीपुर कोल्हार,ता.जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार नागापूर एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरणारा आरोपी अहिल्यानगर तालुक्यातील साईबन परिसरात दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी ताब्यात घेतला.ही कारवाई सहायक फौजदार राकेश खेडकर,सचिन आडबल,राजेंद्र सुद्रिक,किशोर जाधव,नवनाथ दहिफळे यांच्या पथकाने केली.

No comments