adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चितोडा गावापासून सातोद गावापर्यंत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असणाऱ्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे ?

  चितोडा गावापासून सातोद गावापर्यंत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असणाऱ्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे ? भरत कोळी यावल...

 चितोडा गावापासून सातोद गावापर्यंत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असणाऱ्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे ?



भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 तालुक्यातील चितोडा गावापासून सातोद गावापर्यंत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असणाऱ्या या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सद्या सुरू असून सदरचे हे काम फारच निकृष्ठ प्रतिचे करण्यात येत असल्याची तक्रार चितोडा गावाचे लोकनियुक्त सरपंच अरूण देविदास पाटील यांनी केली असून या कामाची तात्काळ चौकशी करून गुणवत्ता सुधारावी अशी मागणीची लिखित तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

सदर दिलेल्या तक्रार निवेदनात चितोडा गावाचे सरपंच अरूण देविदास पाटील यांनी म्हटले की,चितोडा गावापासून सातोद गावापर्यतच्या रस्त्याचे शासनाच्या मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून या कामात संबधीत ठेकेदाराकडून मोठया प्रमाणावर माती मिश्रीत वाळूचा व निकृष्ठ साहीत्याचे वापर करण्यात येत आहे परिणामी सदर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला असुन येत्या काही दिवसात हा रस्ता नाहीसा होईल अशी परिस्थिती ठेकेदाराकड्रन या क्राँक्रीटकरण रस्ता कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहीत्यावरून दिसुन येत आहे.

 जो पर्यंत या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होत नाही तोपर्यंत सदरचे काम थांबण्यात यावे तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कामाच्या ठीकाणी प्रत्यक्ष भेट देवुन सदरील कामाची चौकशी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी चितोडा गावाचे लोकनियुक्त सरपंच अरूण देविदास पाटील केली असुन सदरच्या कामाची तात्काळ चौकशी न झाल्यास आपण लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचे म्हटले

No comments