adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खामगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमी पोलिसांनी केली रविकांत तुपकर समर्थक अक्षय पाटील व वैभव जाणे यांना अटक....!

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खामगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमी पोलिसांनी केली रविकांत तुपकर समर्थक अक्षय पाटील व वैभव जाणे यांना अटक....! ज...

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खामगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमी पोलिसांनी केली रविकांत तुपकर समर्थक अक्षय पाटील व वैभव जाणे यांना अटक....!


जळगाव (जामोद) प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव (जामोद)-:- आज दिनांक १२ जुन रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे खामगाव दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील अनेक मंत्री येणार आहे.या राज्यात शेतकरी अडचणी मध्ये आहे. शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही. पिक विमा नाही, कर्जमुक्ती नाही 


त्यामुळे शेतकरी आज मरणाचा दारात उभा आहे. तरी सुद्धा या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचे काम करत आहे या वाचाळवीर मंत्र्यांना उत्तर विचारणं खूप महत्त्वाचे असतांनी जळगाव जामोद पोलिसांनी युवा आंदोलक अक्षय पाटील , वैभव जाणे यांना घरून अटक केली.



खरंतर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जाहीरनाम्यावर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशे शेतकऱ्यांना आश्वासित केले होते. परंतु लबाडाचं आवतन जेवल्यावरती खरं ...अशी परिस्थिती या महायुती सरकारने शेतकऱ्यावर आणली आहे. पोलिसांनी आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कितीही वेळा अटक केली तरी आम्ही थांबणार नाही लढत राहणार.

No comments