Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कृषी कन्या यांच्या कडून जि. प. मराठी शाळा विरवली येथे राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन.

  कृषी कन्या यांच्या कडून जि. प. मराठी शाळा विरवली येथे राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपाद...

 कृषी कन्या यांच्या कडून जि. प. मराठी शाळा विरवली येथे राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन.


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

दि. १७ जुन रोजी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विरवली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्षाच्या कृषीकन्या धनश्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, प्रतीक्षा गावित, विशाखा सोनावणे यांनी शाळेला भेट देऊन राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी  विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊंच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या मातृत्व, नेतृत्व व राष्ट्रनिर्माणातील विद्यार्धिनींने योगदानाची प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांपुढे मांडली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा आणि राष्ट्रभक्तीचा सन्मान निर्माण झाला. कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ. संगीता बारी मॅडम (श. स. चौधरी कन्या विद्यालय, यावल) व मुख्याध्यापिका सौ.योगेश्वरी धनगर मॅडम व शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षकांनीही जिजाऊंच्या कार्यावर मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना स्वाभिमान आणि शौर्याचे महत्त्व पटवून दिले.

No comments