Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महर्षी वाल्मिक प्रवेश द्वार उभारणी साठी ग्रा.पं.सांगवी बु समोर आमरण उपोषण.

  महर्षी वाल्मिक प्रवेश द्वार उभारणी साठी ग्रा.पं.सांगवी बु समोर आमरण उपोषण. भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल त...

 महर्षी वाल्मिक प्रवेश द्वार उभारणी साठी ग्रा.पं.सांगवी बु समोर आमरण उपोषण.


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील सांगवी बु गावात ग्रामपंचायत ने तोंडी दिलेल्या जागे ठिकाणीच महर्षी वाल्मिक प्रवेश द्वार उभारण्यात यावे या मागणी साठी गावातील रवींद्र रामभाऊ कोळी रा. सांगवी बु, या युवकाने आज दिनांक १७/०६/२०२५ वार मंगळवार सकाळी १० वाजता पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. 


     सविस्तर वृत्त असे कि ग्रामपंचायत सांगवी बु सरपंच आणि सदस्य यांच्या वतीने काही दिवसा अगोदर,महर्षी वाल्मिक प्रवेश द्वारसाठी तोंडी जागा देण्यात आली होती, मात्र अनेक दिवस उलटून सुद्धा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक तेथे प्रवेश द्वार बांधण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे तसेच गावातील या प्रवेश द्वार वरती आक्षेप किव्वा हरकत घेणारे अर्जदार आसिफ इस्माईल मन्यार या अर्जदाराने जो अर्ज दिलेला आहे,त्या अर्जावर सह्यांची पाळताळणी करून चौकशी करण्यात यावी आणि प्रवेश द्वार लवकर बांधून देण्यात यावे म्हणून या दोन प्रमुख मागण्यासाठी हे आमरण उपोषण चालू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे,तर जो पर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत, तो पर्यंत आमरण उपोषण चालूच राहील असे रविंद्र कोळी यांनी सांगितले .

   सदर वेळ प्रसंगी शरद कोळी, दगळू कोळी, दिपक कोळी, विशाल कोळी, सचिन कोळी, करण कोळी, आकाश कोळी, प्रकाश कोळी, रघुनाथ कोळी, विकास कोळी, धिरज कोळी, कुंदन कोळी,भरत कोळी, विकास कोळी, योगेश कोळी, कोमल कोळी, आदीसह अनेक समाज बांधव उपस्थित असल्याचे चित्र आहे, तर या कडे गावातील सर्व जनतेचे लक्ष लागले असून पुढे काय होते किव्वा याचा निकाल काय लागतो या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments