गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जवळ बाळगणारा रेकॉर्डवरील आरोपीस कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमका...
गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जवळ बाळगणारा रेकॉर्डवरील आरोपीस कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरातील क्लेरा ब्रुश ग्राउंड येथे काहीतरी करण्याच्या उद्देशाने एक इसम कमरेला शस्त्र लावून संशयितरित्या फिरत आहे अशी माहिती कोठवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना मिळाली होती.त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना याची माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले.पोलीस अंमलदार मिळालेल्या माहितीनुसार सदरील ठिकाणी गेले असता तेथे एक इसम संशयितरित्या फिरताना दिसला त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतूस सापडले. त्यास त्याचे नाव विचारलं असता त्यांनी त्याचे नाव बिरजा उर्फ बिरजू जाधव (रा.पाटील हॉस्पिटलच्या मागे कोठी) असे सांगितले.पोलीस अंमलदार सुरज दिलीप कदम यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड हे करीत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड,पोलीस अंमलदार विशाल दळवी,महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले,दीपक रोहकले,तानाजी पवार,सुरज कदम,सचिन लोळगे,राम हंडाळ, महेश पवार,प्रतिभा नागरे यांनी केली आहे.

No comments