adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रेल्वे बोर्ड चेअरमन श्री.सतीश कुमार यांची केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी घेतली भेट - रावेर लोकसभा अंतर्गत रेल्वे स्थानकांवर थांबे वाढवण्यावर झाली चर्चा

  रेल्वे बोर्ड चेअरमन श्री.सतीश कुमार यांची केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी घेतली भेट - रावेर लोकसभा अंतर्गत रेल्वे स्था...

 रेल्वे बोर्ड चेअरमन श्री.सतीश कुमार यांची केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी घेतली भेट - रावेर लोकसभा अंतर्गत रेल्वे स्थानकांवर थांबे वाढवण्यावर झाली चर्चा


जळगाव...(अनिलकुमार पालीवाल, याजकडून)

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

रेल भवन (नवी दिल्ली)  येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे  यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री.सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेर स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे मिळावेत अशी मागणी केली. या बैठकीत भुसावळ रेल्वे विभागातील स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे  रावेर, वरणगाव, बोदवड, निंभोरा, मलकापूर व नांदुरा  इ. स्थानकांवर देण्याबाबत सुद्धा चर्चा झाली. याचबरोबर, प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या खालील नमूद रेल्वेगाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करावेत, अशी विनंती सुद्धा करण्यात आली.

* दानापुर पुणे एक्सप्रेस गाडी क्र.12150 – रावेर थांबा (पुणे मार्ग)

* नवजीवन एक्स्प्रेस गाडी क्र. 12656/12655 – बोदवड थांबा

* महानगरी एक्सप्रेस गाडी क्र. 22177/22178 – रावेर थांबा

* अमृतसर मुंबई एक्सप्रेस गाडी क्र. 11057/ 11058 – निंभोरा थांबा

* गरीब रथ एक्सप्रेस गाडी क्र. 12113/12114 – मलकापूर थांबा

* गाडी क्र. 12719/12720 आणि 22137/22138 – नांदुरा थांबा

* आझाद हिंद एक्सप्रेस गाडी क्र. 12129/12130 – बोदवड थांबा

* सूरत अमरावती एक्सप्रेस गाडी क्र. 20925/20926 – बोदवड थांबा

रावेर या ठिकाणी गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग आणि सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच यामुळे संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल. रेल्वे मंत्रालयाकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांनी सदर मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच या मागण्यांवर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

No comments