adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रवादी (शप) च्या पदाधिकाऱ्यांनी दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे... शेतकऱ्यांना कर्जमाफी करा मागणी

  राष्ट्रवादी (शप) च्या पदाधिकाऱ्यांनी दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे...  शेतकऱ्यांना कर्जमाफी करा मागणी  विकास पाटील धरणगाव (संपादक -:-...

 राष्ट्रवादी (शप) च्या पदाधिकाऱ्यांनी दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे...  शेतकऱ्यांना कर्जमाफी करा मागणी 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगांव -- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धरणगाव कडे येत असतांना पिंप्री गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन केले.

                 याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रोजी क्रांतिवीर खाजाजी नाईक स्मारकाचे लोकार्पण व उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी धरणगाव कडे येत होते. दरम्यान पिंप्री गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे काळे झेंडे, निषेधाचे बॅनर दाखवत तसेच जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

                  निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन युती सरकारने दिले होते मात्र त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. याच अनुषंगाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी द्या, नुकसानग्रस्तांना सुधारित जीआर काढून हेक्टरी ४ हजार रुपये मदत द्या अशा आशयाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलन कर्त्यांना पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कल्पिता पाटील, संजय पाटील, बाळासाहेब पाटील (बाळू आबा), उज्ज्वल पाटील, हितेंद्र पाटील, रियाज देशमुख आदींनी सहभाग नोंदवला.

No comments