उत्साह पूर्ण वातावरणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित,प्रताप वि...
उत्साह पूर्ण वातावरणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित,प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल,चोपडा
या ठिकाणी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.योग दिनाचे महत्त्व,योगआसनाचे फायदे,योगआसनामुळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम किती फायदेशीर आहेत या संदर्भातला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक समाधान माळी सर यांनी केले.
शरीराला आवश्यक असा व्यायाम प्रकार वार्मअप,सूर्यनमस्कार पासून सुरवात नंतर योगासनाची आसने ताडासन त्रियक ताडासन वक्रासन वृक्षासन अर्धचक्रासन त्रिकोणासन वीरभद्रआसन पादहस्तासन वज्रासन बालासन पवन मुक्तआसन बद्धकोणासन भुजंगासन विरासन शवासन इत्यादी आसन घेत प्राणायाम मध्ये भस्त्रिका प्राणायाम कपालभारति प्राणायाम बाह्य प्राणायाम अनुलोम-विलोम प्राणायाम भ्रामरी प्राणायाम उद्गीथ प्राणायाम शेवटी शांती मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या योग दिनाच्या कार्यक्रमाला चोपडा एज्युकेशन सोसायटी चे सचिव आदरणीय माधुरीताई मयूर उपस्थित होत्या त्यांनी देखील आसने केली त्याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्यात तसेच समन्वयक गोविंद गुजराथी,डी. टी.महाजन
सर प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक रजीश बलन सर उपमुख्याध्यापिका सौ निखिला मॅडम त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.


No comments