जे टी महाजन पॉलीटेक्निक, फैजपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा ईदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जे. टी महाजन ...
जे टी महाजन पॉलीटेक्निक, फैजपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
ईदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जे. टी महाजन पॉलीटेक्निक न्हावीमार्ग फैजपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७:३० वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. सुरुवातीस तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद भाऊ महाजन यांनी योग दिन साजरा करण्यामागील उद्देश्य सांगून योग गुरु राजेंद्र बोरोले यांचा परिचय करून दिला. त्यानंतर योग गुरु राजेंद्र बोरोले यांनी योग साधना वेगवेगळी आसने त्यांचे उपयोग, फायदे सांगितले त्यांनी बऱ्याच आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व उपस्थितांकडून करवून घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी भरत महाजन यांनी राजेंद्र बोरोले यांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले
या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी तंत्र व वैद्यक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष, संस्थाचालक, जे टी महाजन पॉलिटेक्निकचे प्राचार्य पी एम राणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमाचे अधिकारी किरण पाटील , कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

No comments