निमगव्हाण ते वैजापूर रस्त्याचा वाहतुकीचा खोडंबा, वाहनधारक व प्रवासी करीता ठरत आहे डोकेदुखी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चो...
निमगव्हाण ते वैजापूर रस्त्याचा वाहतुकीचा खोडंबा, वाहनधारक व प्रवासी करीता ठरत आहे डोकेदुखी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अथक प्रयत्नातून निमगव्हाण ते वैजापूर रस्त्याचे कामा करीता २१० कोटी रुपये विधानभवनात वेळोवेळी पाठपुरावा करून निधी मंजूर करण्यात आलेला असून त्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे परंतु या कामासाठी ज्या कंपनीला व ठेकेदाराला हे काम दिले आहे त्यांनी रस्त्याची फार दुरवस्था झालेली आहे तर पर्यायी रस्ता करणं गरजेचं होतं सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वाहनं धारकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.
सदर रस्ता सुरू होऊन सहा महिन्याच्या कालावधी होण्यात आला आहे परंतु रस्त्याची विल्हेवाट व कामकाज अतिशय निशोभनीय व जनतेला त्रासदायक ठरत असून सदरचा रस्त्याचे काम सुरू करण्या अगोदर पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते असे वाहनधारक व प्रवासी यांच्या कडून चर्चा असून या रस्त्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून कोणतीही अडचण होणार नाही असं न होता भरपूर अडचणीचा सामना करून याच रस्त्याने जावे लागत आहे.जोरदार पावसामुळे चिखल झालेले असून यामुळे वैजापूर ते निमगव्हाण रस्त्यावर वाहनाच्या चक्क रांगाच लागल्या दीड ते दोन तास वाहतूक ठप्प झाली व काही वाहन तर चिखलात अडकली व काहींना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढावे लागले. पर्यायी रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. सदर रस्ता नागरिकांसाठी व प्रवाशांसाठी वाहन धारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे तरी संबंधित कंपनी व ठेकेदाराला या सर्व गोष्टींची काळजी घेऊन दोन्ही रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने व वाहतुकीला चांगला राहील व पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी दक्षता घ्यावी व विशेष करून यामध्ये लोकप्रतिनिधी या समस्ये बाबत लक्ष घालून वाहतुकीची व प्रवासी कोंडी न होता पर्यायी रस्ता उपलब्ध करून जनतेचे हाल अपेष्टा होणार नाही याची काळजी घेऊन संबंधित कंपनी व ठेकेदार यांना समज देऊन योग्य पद्धतीने व चांगल्या प्रकारे पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावे असा सूर जनसामान्यातून व काही पदाधिकाऱ्यांन कडून दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे
No comments