गलंगी वाहतूक नियंत्रण कक्ष येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना पासेस सुविधा उपलब्ध ललित बागुल यांच्या प्रयत्नांना यश मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता...
गलंगी वाहतूक नियंत्रण कक्ष येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना पासेस सुविधा उपलब्ध
ललित बागुल यांच्या प्रयत्नांना यश
मच्छिंद्र रायसिंग गलंगी तालुका चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गलंगी तालुका चोपडा येथे असलेले वाहतूक नियंत्रण कक्ष (कंट्रोल पॉइंट) येथे शाळेच्या मुलांना पासेच्या सुविधा उपलब्ध करण्यात आले असून चोपडा किंवा शिरपूर व कुठेही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहज व सोप्या पद्धतीने अशी सुविधा वेळोदे येतील ललित बागुल प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सभापती खरेदी विक्री संघ यांच्या प्रयत्नातून डी .सी साहेब, व डी एम महेंद्र पाटील, टि.आय. सागर, परेश बोरसे इन्चार्ज, नितीन सोनवणे यांच्याशी विनंती करून शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वेळ व पैसा हेलपाटे वाचावे म्हणून प्रयत्न केला व तो यशस्वी करून दाखवला तरी अनेर परिसरातील फक्त विद्यार्थी यांनी गलंगी येथे शाळेच्या पास काढण्यासाठी आपला अमूल्य वेळ व पैसा वाचवा अशी विनंती आहे. तरी वाहतूक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन प्रसंगी घोडगाव येथील उपसरपंच किशोर दुसाने, सुनील देवराज गलंगी, ग्रामपंचायत सदस्य गोपाल देवराज, सतीश देवराज, गोपाळ रायसिंग, शरद रायसिंग, व अनेर परिसरातील गणपुर, भवाळे, कुसुंबा, घोडगाव, वेळोदे, विटनेर, वढोदा व इतर खेड्यातील ग्रामस्थांनी एस. टी. महामंडळाचे व ललित भाऊ बागुल यांचे मनस्वी आभार मानले
काही चालक व वाहकांच्या मनमानी कारभार
अनेर बस स्टॉप हा अनेर परिसरातील केंद्रबिंदू मानला जातो पण काही चालक व वाहक यांच्या लहरीपणामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना पाहून व जास्तच प्रवाशांची गर्दी दिसल्याने अनेर बस स्टॉप वरती गाडीच थांबवत नाही. सकाळी सकाळीच शाळेचे लहान लहान विद्यार्थी व कॉलेजला जाणारे परिसरातील विद्यार्थी गलंगी येथे थांबलेले असतात. व दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दीचे असते. हात दाखवा एसटी थांबा याची अंमलबजावणी काही जण करताना दिसून येत नाही. तरी या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून अशा वाहक व चालक यांना हात दाखवा एसटी थांबवा आठवण करून द्यावी ही विनंती अनेर परिसरातील ग्रामस्थांनी व ललित बागुल माजी सभापती खरेदी विक्री संघ यांनी केली आहे.
No comments