यावल येथील वृत्तपत्र विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, ३८ हजाराचा मोबाईल केला परत. यावल प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शहरातील विस्त...
यावल येथील वृत्तपत्र विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, ३८ हजाराचा मोबाईल केला परत.
यावल प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शहरातील विस्तारित भागात भुसावळ रस्त्यालगत वृत्तपत्र वितरक आपल्या पत्नीसह पायी फिरत असतांना त्यांना एक ३८ हजार रुपये किमतीचा मोबाईल सापडला होता. तेव्हा सदर मोबाईलवर कॉल आल्यानंतर या दांपत्याने सदर मोबाईल धारकाला तो मोबाईल खरच त्याचा आहे का याची पडताळणी केल्यानंतर प्रामाणिकपणे परत केला. सोमवारी सायंकाळी हा मोबाईल त्यांनी संबंधित व्यक्तीला परत दिल्यानंतर त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
यावल शहरात वृत्तपत्र वितरक मुकुंदा भार्गव व त्यांच्या पत्नी माधवी भार्गव हे दाम्पत्य भुसावळ रस्त्या लागत असलेल्या विस्तारित भागातील पुण्यनगरी नगरात जात होते. दरम्यान त्यांना एक मोबाईल सापडला याची किंमत ३८ हजार रुपये होती. त्यांनी तो मोबाईल आपल्या घरी नेला आणि त्या मोबाईलवर काही वेळानंतर कॉल आला. तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे हा मोबाईल आपल्याला सापडला आहे. याचा जो कोणी मालक असेल त्याची खात्री पटल्यानंतर त्याला आम्ही तो परत देणार आहोत. तेव्हा ज्याचा मोबाईल आहे त्यांनी कृपया आपले मोबाईलचे बिल घेऊन आम्ही राहत असलेल्या पत्त्यावर किंवा ते राहत असल्या पत्त्यावर त्यांना पोहोच करू असे प्रामाणिकपणे सांगितले. आणि या मोबाईल धारकाची पडताळणी केल्यानंतर तो मोबाईल परेश सुरेश भोई यांचा असल्याचे समोर आले. तेव्हा भार्गव दांपत्याने प्रामाणिकपणे त्यांचा मोबाईल त्यांना परत केला तेव्हा त्यांच्या या प्रामाणिकपणाचे शहरातून कौतुक होत आहे.-

No comments