महेश गायकवाड यांची पत्रकार सेवा संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड अडावद (ता. चोपडा), दि. ११ : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्य...
महेश गायकवाड यांची पत्रकार सेवा संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
अडावद (ता. चोपडा), दि. ११ :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील अडावद गावाचे सुपुत्र व सायंकाळ दैनिक एकता वृत्तपत्राचे मुख्य संपादक श्री. महेश गायकवाड यांची पत्रकार सेवा संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड संघटनेचे अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारिणी यांच्यावतीने करण्यात आली.
महेश गायकवाड यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले, “सत्याची बाजू धरून चालत राहिल्यास यश नक्की मिळतं.” महेश गायकवाड यांच्या निवडीमुळे अडावद गावात आनंदाचे वातावरण आहे. “ही निवड म्हणजे सत्याचा विजय आहे,” अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.

No comments