adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सातारा पोलीस प्रशासन सज्ज:- पोलीस अधीक्षक तुषार दोशी..!!

 श्री. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सातारा पोलीस प्रशासन सज्ज:- पोलीस अधीक्षक तुषार दोशी..!!  संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा...

 श्री. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सातारा पोलीस प्रशासन सज्ज:- पोलीस अधीक्षक तुषार दोशी..!! 


संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 भेटी लागे जीवा लागलीस आस..!! श्री. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सन 2025  सातारा जिल्ह्यात 26 जून ते 30 जून पर्यंत मुक्कामी असणार आहे. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने  सातारा पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची विशेष तयारी करण्यात आली आहे पालखी मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेविण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्याबाहेरून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. पालखी मार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. (आरोग्य सेवा) वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फिरत्या वैद्यकीय पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. (सी.सी.टीव्ही) पालखी मार्गावर तसेच महत्त्वांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित राहणार आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. आपल्या वस्तूंची आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान देखील सातारा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवणार आहे. अशी माहिती नुकतीच सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी दिली आहे.

No comments