adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ॲल्यूमिनियमच्या तारा व कार सह दोघांना अटक रावेर पोलीसांची धडक कारवाई

  ॲल्यूमिनियमच्या तारा व कार सह दोघांना अटक रावेर पोलीसांची धडक कारवाई  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   सोलर प्र...

 ॲल्यूमिनियमच्या तारा व कार सह दोघांना अटक रावेर पोलीसांची धडक कारवाई 



रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  सोलर प्रकल्पातून अल्युमिनियमच्या चार लाख रुपये किमतीच्या तारांची चोरी करणाऱ्या चोरांच्या रावेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या व दोघांना अटक करून चोरी केलेल्या चार लाख रुपयांच्या ॲल्यूमिनीयमच्या तारा व चार लाख रुपये किमतीचे चार चाकी वाहन असे मिळून एकूण 8 लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे 

याबाबतची सविस्तर माहिती, अशी की  गट नंबर १७८३ मध्ये सोलर प्रोजेक्टरचे काम सुरू आहे. यासाठी भरत कमलाकर महाजन (रा. रावेर) यांनी प्रोजेक्टसाठी आणलेल्या १०० स्क्वेअर एमएम कंडक्टरच्या सुमारे चार लाख रुपये किंमतीच्या सहा ॲल्यूमिनीयम तारांचे बंडल चोरीला गेल्याची तक्रार 8 जून ला रावेर पोलीस स्टेशनला नोंद केली होती. याबाबत रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करीत तपखसचक्रे फिरवून महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांनी पोलीस कर्मचारी पथकाने गुप्त माहिती प्राप्त करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सोलर प्रोजेक्टमधील ॲल्युमिनियम तारा चोरीला गेलेल्या या तार चोरीचा तपास लावला. याप्रकरणी मुदस्सर शेख बदरुज्जमा शेख (३६, रा. जुनेगाव चाळीत मोहल्ला, मुक्ताईनगर), सय्यद आकीब सय्यद हुसेन (२२, रा. इदगाहनगर, मुक्ताईनगर) या दोघांना ताब्यात घेतले व पोलीसी दंडूका दाखवताच 

दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चार लाख रुपये किमतीच्या ॲल्यूमिनियमच्या तारांसह गुन्ह्यात वापरलेली चार लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो (एमएच ४३ बीबी ०५८६) गाडी असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल पो. महिला सपोनि मीरा देशमुख पो कॉ. कल्पेश आमोदकर, पो. कॉ. संभाजी बिजागरे, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, विकारुद्दीन शेख, चालक जमिल शेख, पोहेकॉ संतोष ईदा यांनी परिश्रम घेत कारवाई केली.

No comments