adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अपघाताचा बनाव करुन,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखा कडून निष्पन्न करुन त्यांना जेरबंद

  अपघाताचा बनाव करुन,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखा कडून निष्पन्न करुन त्यांना जेरबंद एरंडोल प्रतिनिधी  (संपादक...

 अपघाताचा बनाव करुन,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखा कडून निष्पन्न करुन त्यांना जेरबंद



एरंडोल प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एरंडोल पोलीस स्टेशन सीसीटीएनएस नं.९६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ वगैरे प्रमाणे गुन्हा नमुद गुन्हयातील फियार्दी नामे कल्पना दशरथ महाजन वय ४१ वर्ष व्यवसाय माजी नगरसेविका न.प.एरंडोल.महात्मा फुले पुतळयाजवळ एरंडोल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिंनाक १४/०६/२०२५ रोजी एरंडोल पोलीस ठाण्यास दाखल होता. नमुद गुन्हयातील जखमी इसम नामे दशरथ बुधा महाजन हे नगरपरिषद एरंडोल येथे माजी उपनगराध्यक्ष होते.त्यावरुन त्यांच्या एंरडोल शहरातील बऱ्याच राजकीय लोकांशी मतभेद होते.त्यावरुन फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांनी सदर झाले प्रकाराबाबत संशय व्यक्त करुन, सदरचा गुन्हयातील जखमी इसम दशरथ महाजन यांचा अपघात नसुन घातपात असण्याची शक्यता वर्तवली होती.

त्यावरुन डॉ.महेश्वर रेड्डी,पोलीस अधीक्षक,जळगाव,यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरचा गुन्हा स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडे पुढील तपासाकरीता वर्ग केला होता.डॉ.महेश्वर रेड्डी,पोलीस अधीक्षक,जळगाव,यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार संदीप पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव स्थानीक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करण्यात आले. नमुद पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी नमुद गुन्हयाच्या अनुशंगाने घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करुन नमुद घटनास्थळाकडे जाणारे येणारे रस्त्यांचे सीसीटीव्ही तपासण्याच्या कामाला सुरुवात केली. परंतु घटना घडली त्यादिवशी व त्यानंतर वादळ व पाऊसमुळे बऱ्याच ठिकाणी विदयुत पोल कलल्यामुळे विदयुत प्रवाह बंद असल्याने सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु तपास पथकाने एका पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेजचे तपास पथकातील पोहवा प्रविण मांडोळे व राहुल कोळी यांनी सतत ८ तास परीक्षण करुन,नमुद गुन्हयात आरोपी निष्पन्न करुन,सदरचा गुन्हा हा अपघात नसुन घातपात असल्याचे उघडकीस आणले व नमुदचा गुन्हा करणारे इसम नामे १) उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार वय ४० वर्ष २) शुभम कैलास महाजन वय १९ वर्ष ३) पवन कैलास महाजन वय २० वर्ष सर्व रा.एरंडोल ता.एरंडोल जि जळगाव यांना निष्पन्न करुन,स्थानीक गुन्हे शाखेचे तपासपथकाने शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता नमुद आरोपीतांनी सदर गुन्हा केला असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. कबुली दरम्यान आरोपी उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार याने सदरचा गुन्हा पुर्व वैमनस्यातुन केला असल्याचे सांगीतले आहे.तसेच गुन्हा करतांना गुन्हयात वापरलेली महींन्द्रा & महींन्द्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी आरोपी उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार वय ४० वर्ष याच्याकडुन जप्त करण्यात आली आहे.सदर गुन्हयात वरील आरोपीतांना अटक करण्यात आली असुन,न्यायालयासमोर त्यांना हजर करुन,अजुन कोणाचा सदर गुन्हयात सहभाग आहे अगर कसे? याचा पोलीस सखोल तपास करीत आहेत.

सदरची कार्यवाही डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक,जळगाव,कविता नेरकर,अपर पोलीस अधीक्षक,चाळीसगाव तसेच विनायक कोते उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी संदीप पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव,निलेश गायकवाड पोलीस निरीक्षक एरंडोल पोलीस स्टेशन,पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,सोपान गोरे पोहवा हरीलाल पाटील,संदीप पाटील,प्रविण मांडोळे,अक्क्रम शेख,प्रविण भालेराव,रवि कापडणे, राहुल कोळी,जितेंद्र पाटील,भुषण पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोशि प्रशांत पाटील एरंडोप पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केली आहे.

No comments