शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत! शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आज दि . १६/६/२०२५ सोमवार रोजी नगर परिषद...
शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत!
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज दि . १६/६/२०२५ सोमवार रोजी नगर परिषद प्राथमिक शाळा क्र.३शिरपूर शाळेत मोठ्या उत्साहातआणि दिमाखदारपणे शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सुट्ट्या संपवून शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. विशेषतः, पहिल्यांदाच शाळेत पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता.
सकाळपासूनच शाळेत विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची गर्दी सुरू झाली होती. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक फुग्यांची सजावट करण्यात आली होती आणि रांगोळ्यांनी परिसर अधिकच सुंदर दिसत होता. आस्थापना विभाग प्रमुख सन्माननीय श्री सतीश कोळी, माझी मुख्याध्यापक, जॉइंट्स क्लब चे प्रमुख सन्माननीय श्री श्रीराम सोनवणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री विकास शिरसाठ, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश भाऊ बाशिंगे इत्यादी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी बोलताना माझी मुख्याध्यापक श्री. श्रीराम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, "शाळा हे ज्ञानमंदिर आहे आणि इथे येऊन तुम्ही भविष्याची मजबूत पायाभरणी करत आहात. आम्ही तुमच्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहोत." शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना अभ्यासात मदत करण्याचे आश्वासन दिले.
नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि थोडी भीती असे संमिश्र भाव दिसून आले. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. एका पालकांनी सांगितले की, "अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे मुलांच्या मनातील शाळेविषयीची भीती कमी होते आणि त्यांना शाळेची गोडी लागते."
शाळा प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असून, नवीन शैक्षणिक वर्षाची दमदार सुरुवात झाली आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांची वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली. त्यांचे औक्षण करून पुष्पाचा वर्षाव करून मुलींचे पायांचे ठसे तर मुलांचे हाताचे ठसे घेऊन वर्ग प्रवेश करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय पाठ्यपुस्तके गणवेश बूट सॉक्स यांचे वितरण करण्यात आले. माजी मुख्याध्यापक तसेच जॉइंट्स क्लब चे प्रमुख सन्माननीय श्री श्रीराम सोनवणे यांच्या वतीने समग्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इंगोले सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूर्यवंशी मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक श्री पावर सर यांनी केले.

No comments