मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट तर्फे मेहकर येथे गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा संपन्न विकास पाटील (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मेहकर : दिनांक ...
मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट तर्फे मेहकर येथे गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
विकास पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मेहकर : दिनांक 14 जून 2025 रोजी मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट अंतर्गत मेहकर येथील रुद्र क्लासेस येथे इयत्ता १० वी व १२ वी च्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांचे सन्मान व सत्कार करून त्यांना सन्मानपत्र व शालेय साहित्य वितरण करण्यात आले. या सन्मान सोहळ्याकरीता मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष मा.गजानन इंगळे,सचिव मा. गोविंद अग्रवाल तसेच कोषाध्यक्ष मा. संगीताताई साबणकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. गजानन शिवनाथ इंगळे,राष्ट्रीय महिला प्रमुख मा. रंजनाताई चव्हाण,सहप्रमुख मा. ज्योतीताई बावस्कर, महाराष्ट्र अध्यक्ष मा. पवन जैन,महाराष्ट्र मीडिया प्रमुख मा. समाधान पदमने,महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा. आरतीताई दीक्षित, महाराष्ट्र सहकार्याध्यक्ष मा. रामेश्वर कापडे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच आमचे मार्गदर्शक मा.जनार्दन चांगदेव वनारे सर,अकोला जिल्हा अध्यक्ष मा. भास्कर जाधव,अकोला संघटक मा. माधव इंगळे,अकोला मीडिया प्रमुख मा. कैलास पोहनकार,तेल्हारा तालुका अध्यक्ष अंबादास आगरकर,मेहकर तालुका अध्यक्ष संदीप बोऱ्हाडे, मेहकर उपाध्यक्ष दत्तात्रय वाघमारे,चिखली तालुका अध्यक्ष गोपाल सोनटक्के,खामगाव मा. जगन्नाथ चोपडे सर तसेच रुद्र कलासेस संचालक विशाल चांगाडे सर, संदीप वनस्कर व सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थित गुणवंत विध्यार्थी यांचा सन्मान सत्कार घेऊन प्रमाणपत्र व शालेय साहित्य वितरण व पुस्पगुछ देऊन पुढील उज्ज्वल भविष्यासाठी सर्व उपस्थिती पदाधिकारी यांच्या कडून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ चोपडे,आणि रंजनाताई चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन आरतीताई दीक्षित यांनी मानले.

No comments