आदिवासी बांधवाचे मोफत मोतीबिंदू शास्रक्रिया शिबिर संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : सातपुडा आदिवासी भागातील पुर...
आदिवासी बांधवाचे मोफत मोतीबिंदू शास्रक्रिया शिबिर संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : सातपुडा आदिवासी भागातील पुरुष महिला ना अंधत्वचे निर्माण फार मोठ्या प्रमाणावर दिसत असुन त्यांची आर्थिक परिस्थिती व योग्य दवाखाना मिळत नसतो. यामुळे एक महिन्या अगोदर समता फाउंडेशन चे चेतन डिसोजा आणि प्रमोद बारेला उप सरपंच कर्जाणे यांची येथे भेट झाली,आणि आदिवासी भागात मोतीबिंदू तपासणी शिबीर राबून जळगाव कांताई हॉस्पिटलला शस्त्रक्रिया करू अशी चर्चा झाली,
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर यांचे अधिकारी,डॉ श्री निळे तसेच दत्ता पावरा सरपंच वैजापूर यांच्याशी संपर्क साधला आणि शनिवार रोजी,प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर येथे शिबीर तपासणी करण्यात आली,त्याठिकाणी एकूण सत्तर लोकांची तपासणी केली त्यापैकी सोळा लोकांचे वेगवेगळ्या गावाचे व पाड्याचे पुरुष व स्त्री आज कांताई हॉस्पिटल जळगाव येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलं,तसेच आदिवासी भागात प्रमोद बारेला व नामा पावरा आदिवासी सामाजिक कार्यकर्ते दवाखान्याच्या क्षेत्रात आरोग्य दूत म्हणून सेवा देत आहे.आणि या शिबिरात ग्रा.प.सदस्य वैजापूर जयसिंग पावरा यांनीही सहकार्य केले.उपस्थित डॉ चेतन गायकवाड,डॉ.निळे,प्रमोद बारेला उप सरपंच व चेतन डिसोजा,बबलू बारेला शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते
प्रतिक्रिया : मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर हे दुसऱ्यांदा घेण्यात आलं असून आदिवासी भागामध्ये मोतीबिंदू असलेले व डोळ्यांन वरती साय असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून आले त्यामुळे, पुढील महिन्यात लवकरात लवकर तिसऱ्या कॅम्पचे आयोजन करण्यात आलं येईल
प्रमोद बारेला उप सरपंच कर्जाणे


No comments