अंतुर्ली परिसरातील मान्सूनपूर्व शेतीच्या कामाची लगबग सुरू किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अंतुर्ली ता. मुक्ताईनगर परिस...
अंतुर्ली परिसरातील मान्सूनपूर्व शेतीच्या कामाची लगबग सुरू
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर परिसरातील मान्सूनपूर्व शेतीच्या कामाची लगबग सुरु, शेतीची मशागत ही खरीप हंगामापूर्वीच करावी लागते. वर्षातून एकदा ही मशागत करून उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांचा प्रयत्न राहतो. मशागत केल्याने शेतजमीन ही भूसभुशीत होते. शिवाय उत्पादन वाढीसाठी ही प्रकिया महत्वाची आहे यामुळे जमिनीचा पोत वाढतो तनविरहित पिकांसाठी मशागत करणे गरजेचे आहे.उन्हाळी पिकांची काढणी होताच पावसाला सुरवात होईपर्यंत ही कामे आटपून घेतली जातात.यातच आता मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेती कमांना वेग आला आहे.

No comments