adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पॅगो चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पॅगो चोरणारा चार तासातच कोतवाली पोलिसांकडून जेरबंद

  पॅगो चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पॅगो चोरणारा चार तासातच कोतवाली पोलिसांकडून जेरबंद   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गाय...

 पॅगो चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पॅगो चोरणारा चार तासातच कोतवाली पोलिसांकडून जेरबंद  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि५):-जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पॅगो कंपनीची ऍपे रिक्षा व मोबाईल चोरणारा आरोपीस ५५,०००/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ४ तासाचे आत कोतवाली पोलीसांच्या ताब्यात घेतले आहे. दि.०१ जून २०२५ रोजी पहाटे ०५.०० वा.चे सुमारास अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक भागातील संग्राम वाईन्स समोरुन फिर्यादी नामे रविंद्र काशीनाथ लांडगे (वय ३५ वर्षे,धंदा रिक्षाचालक, रा. पिंपळगाव लांडगा,ता.जि. अहिल्यानगर) यांनी त्यांच्या पॅगो कंपनीची अॅपे रिक्षा मध्ये आम्हाला कल्याण बायपास रोड येथे जावयाचे आहे असे सांगुन दोन अनोळखी इसम बसले व तेथे गेल्यावर काहीएक कारण नसतांना फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांचा १)५,०००/- रुपये किंमतीचा व्हिवो कंपनीचा पांढरे रंगाचा एक मोबाईल फोन जुना वापरता किंमत अंदाजे,२) ५०,०००/- रुपये किंमतीची पॅगो कंपनीची अॅपे रिक्षा काळ्या रंगाची तिचा क्रमांक- MH- २० T- ३५८९ असा असलेली जुना वापरता किंमत अंदाजे असा एकुण ५५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांचे ताब्यातुन बळजबरीने चोरी करुन घेवुन गेले बाबत नमुद तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे गु.र.नं.५१९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे दि. ०१/०६/२०२५ रोजी २१.५२ वाजता दाखल करण्यात आला होता.कोतवाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांनी गुन्ह्याचे तपास कामी पोसई/गणेश देशमुख व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना कारवाई कामी आदेश दिले.पोसई/गणेश देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की,सदर गुन्ह्यातील अॅपे रिक्षा व मोबाईल चोरी करणारा इसम हा चोरी करुन पारनेर परीसरात आहे अशी माहिती मिळाल्याने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे लागलीच पोसई/गणेश देशमुख यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांचेसह शोध घेत असतांना सदर आरोपी अॅपे रिक्षा व मोबाईल सह पारनेर येथे मिळुन आल्याने नमुद इसमास ताब्यात घेतले असुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव विठ्ठल रामकिसन रुपनर,वय २३ वर्षे, रा.आडगाव,माका,ता.नेवासा, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले असुन त्याचेकडे सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने चौकशी केली असता सदर आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यास विश्वासात घेवुन सखोल चौकशी करता त्याने सदर गुन्ह्यातील नमुद पॅगो कंपनीची अॅपे रिक्षा व मोबाईल फोन हे चोरी केलेबाबत कबुली दिली. नमुद आरोपीकडुन एकुण ५५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन सदर गुन्ह्याचा तपास पो.स.ई. गणेश देशमुख हे करीत आहे.सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे, पो.स.ई.गणेश देशमुख,स.फौ. लक्ष्मण बोडखे,पो.हे.कॉ.विशाल दळवी,पो.कॉ.सोमनाथ केकाण, कुणाल खरात,सत्यजीत शिंदे, म.पो.कॉ.प्रतिभा नागरे यांनी  केली आहे.

No comments